Breaking

Friday, July 30, 2021

धोनीच्या नव्या लूकची होतेय जोरदार चर्चा, फोटो झाले जबरदस्त व्हायरल... https://ift.tt/2UXN0lf

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी विश्वविजेता कर्णधार महेंद्रसिंह धोनी सोशल मीडियात सक्रीय नसतोच. पण तरीही तो कायम चर्चेत राहतो. निवृत्तीनंतरही सोशल मीडियावरील त्याच्या चाहत्यांची संख्या काही कमी झालेली नाही. त्यामुळेच त्याचे फोटोही काही वेळात जोरदार व्हायरल होतात आणि तो ट्रेंडिंगमध्ये येतो. आताही धोनी त्याच्या नव्या लूकमुळे चर्चेत आला आहे. त्याचा हा नवा लूक पाहून चाहते खूश झाले आहेत. प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट अलीम हकीमने कॅप्टन कूल माहीचा हा नवा लूक सेट केला आहे. तो त्याला आणखी कूल बनवतो. स्वत: अलीमने त्याच्या इन्स्टाग्रामवरून धोनीचे फोटो शेअर केले आहेत. धोनीच्या चाहत्यांनी त्याच्या नव्या लूकवर उड्या घेतल्या आहेत. अनेकांनी धोनीचे जुने हेअर स्टाईलचे फोटोही शेअर केले आहेत. भारताला दोन वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देणाऱ्या धोनीचे जगभरात फॅन्स आहेत. 2004मध्ये धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं, तेव्हा त्याच्या लांब केसांची खूप चर्चा झाली होती. ती हेअर स्टाईल खूप दिवस चर्चेत होती. पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनीही धोनीच्या हेअरस्टाइलचं कौतुक केलं होतं आणि त्याला हेअरस्टाईल कधीही बदलू नको, असंही सुचवलं होतं. दरम्यान, चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार असलेल्या धोनीचे भारतीय संघाच्या रेट्रो जर्सीतील फोटो काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते. 7 क्रमांकाच्या रेट्रो जर्सीत धोनी दिसल्यामुळे तो पुन्हा मैदानावर उतरणार का या चर्चेला उधाण आले होते. पण एका जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी नव्या लूक आणि रेट्रो जर्सीत धोनी दिसला होता. आतापर्यंत धोनीने आपल्या लूकमध्ये भरपूर वेळा बदल केला आहे. धोनी जेव्हा जेव्हा आपेल लुक्स बदलतो तेव्हा तेव्हा तो चर्चेत आलेला असतो. यावेळीही धोनीचा लुक हा चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचबरोबर धोनीच्या या नवीन लुक्सचे फोटो चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे धोनीचा हा नवीन लुक आयपीएलमध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतील.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2TJMypT

No comments:

Post a Comment