Breaking

Thursday, July 29, 2021

पूरग्रस्त भागात पोहोचलेल्या रोहित पवारांची फडणवीसांवर जोरदार टीका, म्हणाले... https://ift.tt/2V0Y4hj

: ' हे मुख्यमंत्री असताना २०१९ साली निर्माण झालेली पूर परिस्थिती हाताळण्यात ते कमी पडले होते. जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि जलसंपदा विभागाने आताच्या पुरात चांगलं काम केलं आहे. उलट २०१९ च्या पुरावेळी जलसंपदा विभागाचे काम व्यवस्थित झाले नव्हते. २०१९ च्या पुराच्या वेळी पूर्ण नियोजन चुकले होते,' अशी टीका राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार यांनी केली आहे. गुरुवारी सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी आले असता रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रोहित पवार यांनी राष्ट्रवादी कार्यालयात अहमदनगर जिल्ह्यातून आलेली मदत स्थानिक नेत्यांकडे सुपूर्द केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय नेत्यांनी दौरे करू नयेत, असा सल्ला दिला होता, याबाबत रोहित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, 'मी काय नेता नाही. मी कार्यकर्ता आहे, मी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आलो आहे. शिवाय जिल्हाधिकरी, एसपी, सीइओ यांना आम्ही दौऱ्यात अडकवून ठेवत नाही. अधिकाऱ्यांना कोणीही अडकवून ठेवू नये,' असं आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, तुमचे नेते फोटो काढायला येतात. आम्ही मात्र मदत करायला येतो. हा तुमच्यात आणि आमच्यात फरक आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी भाजपच्या नेत्यांना लगावला. तसेच २०२१ च्या पुराची परिस्थिती आवाक्यात आहे, मात्र फडणवीस सरकारवेळी पूरपरिस्थिती आवाक्यात नव्हती, असंही ते म्हणाले. रोहित पवार यांनी नक्की काय मदत केली? पूरग्रस्तांसाठी संकटात खारीचा वाटा म्हणून आमदार रोहित पवार यांच्याद्वारे 'कर्जत जामखेड मतदारसंघातील नागरिक' आणि 'बारामती ऍग्रो' कंपनीच्या माध्यमातून राज्यातील विविध भागातील पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्याच्या उद्देशाने १ लाख ६५ हजारांहून अधिक आवश्यक साहित्याची व्यवस्था केली आहे. पुराच्या पाण्यामुळे संसार उद्ध्वस्त झालेल्या कोल्हापूर येथील नागरिकांना तातडीची मदत म्हणून सोलापुरी चादर २५०० नग, बिस्कीट पुडे २१ हजार ४००, पाण्याच्या बॉटल २५००, सॅनिटरी नॅपकिन्स २५००, क्लोरीन पावडर १२५ किलो, मॅगी नुडल्स ५००० पॅकेट, २५०० नग माचीस आणि २६०० नग मास्क वाटप केले. या साहित्याचे गरजू नागरिकांना न्याय्य वाटप व्हावे यासाठी ते स्वत: पूर बाधित गावांमध्ये पोहोचले आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2VmVB0g

No comments:

Post a Comment