Breaking

Saturday, July 3, 2021

बोगस लसीकरण झालेल्या नागरिकांची अँटीबॉडी चाचणी होणार https://ift.tt/3AsYAEP

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई झालेल्या नागरिकांची आरोग्यतपासणी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यामध्ये या व्यक्तींमधील अॅंटीबॉडी चाचण्यादेखील करण्यात येणार आहेत. यामुळे या व्यक्तींमध्ये लशीऐवजी अन्य कोणता द्रव टोचण्यात आला, याची पडताळणी करण्यात येणार आहे. पालिकेतील वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, लशीची पहिली मात्रा घेतल्यानंतर किमान दोन आठवड्यानंतर आजाराच्या विरोधात प्रतिकारशक्ती तयार व्हायला सुरुवात होते. प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या प्रमाणामध्ये अॅंटीबॉडी तयार होतात. या व्यक्तींमध्ये त्या किती आहेत, याची वैद्यकीय पडताळणी करणे गरजेचे आहे. लसीकरण झाल्यानंतर प्रमाणपत्रे उपलब्ध झाली नाहीत, तसेच ज्यांना मिळाली, त्यांच्या प्रमाणपत्रांवर वेगवेगळ्या रुग्णालयांची नावे होती. त्यामुळे धास्तावलेल्या रहिवाशांना करोनाप्रतिबंधक लशीऐवजी दुसरे कोणते औषध देण्यात आले का? या प्रश्नानेही अस्वस्थ केले आहे. लस घेतलेल्या एकाही व्यक्तीला सर्वसाधारणपणे दिसणारी अंगदुखी, हात जड होणे, सौम्य स्वरूपाचा ताप अशी कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत. त्यामुळे अंॅटीबॉडी चाचणी केल्यास नेमकी माहिती मिळू शकेल.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2V0demt

No comments:

Post a Comment