: अतिवृष्टी आणि महापुरामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मोठं संकट कोसळलं आहे. अनेक वर्ष कष्ट घेऊन उभा केलेला संसार एका फटक्यात उद्धवस्त झाला. राज्य सरकारकडून विविध मंत्री दौरा करत पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेत आहेत. पर्यावरणमंत्री हेदखील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी चिपळूणमध्ये पोहोचले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांना स्थानिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. नागरिकांनी आक्रमकपणे आदित्य ठाकरे यांच्यावर प्रश्नांची सरबत्तीच केली. चिपळूण येथे गुरूवारी २९ जुलै रोजी आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी येथील नागरिकांनी प्रश्न विचारत आपल्या व्यथा मांडल्या. 'तुम्ही कधीतरी येता, पर्यावरणमंत्री आहात ना, तुम्ही कोकणात काय चाललंय बघा जरा...कोळकेवाडीतून पाणी सोडताना कोणतीही कल्पना दिली नाही म्हणून ही आमची अवस्था झाली आहे. तुम्ही हात जोडून परिस्थिती बदलणार नाही. असे पुन्हा घडू नये म्हणून उपाययोजना करा,' असं म्हणत चिपळूणकरांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. 'वाशिष्ठी नदीवरील पुलाचं किती वर्षांपासून काम सुरू आहे, मात्र अजून ते पूर्ण झालं नाही. लोट्यातील कंपन्या खराब पाणी सोडून नद्या नाले प्रदूषित करत आहेत. आपण पर्यावरण मंत्री आहात... लक्ष दया. आपण आज पहिल्यांदाच इकडे आलात. महिन्यातून एकदा येत जा आणि आमचे प्रश्न सोडवा,' अशी मागणी काविळतळी परिसरातील नागरिकांनी केली. नागरिकांना उत्तर देताना काय म्हणाले आदित्य ठाकरे? नागरिकांनी उपस्थितीत केलेल्या प्रश्नांना अदित्य ठाकरे यांनी संयमाने उत्तर दिलं. 'मी स्वत: लक्ष घालेन. येथील परिस्थिती पाहण्यासाठीच मी चालत फिरत आहे,' असं आदित्य ठाकरे म्हणाले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3rF2kim
No comments:
Post a Comment