Breaking

Friday, July 30, 2021

टायगर ग्रुपच्या शहराध्यक्षासह दोघांना बेड्या; 'त्या' धक्कादायक घटनेनंतर होते फरार https://ift.tt/3j8NJrs

सांगली: चोरलेली गाढवे परस्पर विक्री केल्याच्या रागातून एकास मारहाण करत खूनाचा प्रयत्न करणाऱ्या टायगर ग्रुपच्या शहर अध्यक्षासह दोघांच्या मुसक्या ग्रामीण पोलिसांनी आवळल्या. आणि प्रवीण पोपट माने अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या आरोपींनी २१ फेब्रुवारी २०२० रोजी हरिपूर रोड येथे राहणाऱ्या भैय्या बाबासो माने यास लोखंडी रोड आणि काठीने बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा ग्रामीण पोलिसात दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून दोघे पसार होते. पिंटू माने हा ' 'चा शहर अध्यक्ष आहे. ( ) वाचा: याबाबत अधिक माहिती अशी की, २१ फेब्रुवारी २०२० रोजी येथे रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पिंटू माने, अरविंद माने, अमोल माने, मारुती माने, रोहित माने, सहदेव माने, प्रवीण माने यांच्यासह अनोळखी पाच ते सहा जणांनी लोखंडी रॉड आणि काठीने भैय्या माने याला मारहाण केली होती. याबाबत जखमी भैय्या माने याने सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी संशयित पिंटू माने, अमोल माने, अरविंद माने, मारुती माने, रोहित माने, सहदेव माने, प्रवीण माने यांच्यासह अनोळखी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच संशयित पिंटू माने आणि प्रवीण माने हे दोघे पसार झाले होते. ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या दोन्ही संशयितांना अटक केली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3fapoQT

No comments:

Post a Comment