Breaking

Saturday, July 31, 2021

अरेरे! आजीच्या दशक्रियेसाठी गेलेल्या दोन तरुण नातवांचा नदीत बुडून मृत्यू https://ift.tt/3rIu9GE

अमरावती: आजीच्या दशक्रिया विधीसाठी कुटुंबासोबत गेलेल्या विशीतील दोन तरुणांचा नदीवर आंघोळ करताना बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील या गावामध्ये घडली आहे. () मनीष दिलीप टोम्पे (वय २३) व ईश्वर रामराव टोम्पे (वय २५) अशी नदीत बुडून मृत्यू झालेल्या दोन तरुणांची नावं आहेत. या दोन्ही तरुणांच्या आजीचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर आज दशक्रियेचा कार्यक्रम गावातील एका नदीकाठच्या मंदिर परिसरात आयोजित करण्यात आला होता. पूजेला बसण्याआधी मनीष व ईश्वर हे दोघेही नदीत आंघोळ करायला गेले. पावसाचे दिवस असल्याने नदीला जास्त पाणी होते. आंघोळ करताना हे दोघांच्याही लक्षात आले नाही. पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे निर्माण झालेल्या भोवऱ्यात अडकून हे दोघेही बुडाले. आपण पाण्यात अडकल्याचं समजताच त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून नातेवाईक धावत आले आणि नदीत उतरले. या दोघांचाही जीव वाचवण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. दोघांच्याही नाकातोंडात पाणी जाऊन त्यांचा मृत्यू झाला होता. एक माणूस गेल्यामुळं कुटुंबात दु:खाचं वातावरण असतानाच दोन्ही तरुण मुले नदीत बुडून मृत्युमुखी पडल्याने टोम्पे कुटुंबावर अक्षरश: दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळं संपूर्ण खानापूर गवळी गावावर शोककळा पसरली आहे. आणखी वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3C39T7h

No comments:

Post a Comment