Breaking

Saturday, July 31, 2021

'शिवसेना भवन' फोडण्याची भाषा; शिवसेनेचं भाजपला कडक उत्तर https://ift.tt/3xmZDU4

रत्नागिरी: नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागल्यापासून शिवसेना व भाजपमधील वाकयुद्धाला धार चढली आहे. शिवसेनेवर टीका करणाऱ्या राणे कुटुंबीयांना इतर पक्षातून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांचीही साथ मिळू लागली आहे. '' फोडण्याची भाषा करण्यापर्यंत हे वाकयुद्ध पोहोचलं आहे. भाजपचे आमदार यांनी शनिवारी तसं वक्तव्य केल्यानंतर त्याचे पडसाद थेट कोकणात उमटू लागले आहेत. ( over his comment on Shiv Sena Bhavan) भाजपचे आमदार यांनी लाड यांना थेट इशारा दिला आहे. 'शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणाऱ्यांचे थोबाड फोडू,' असं साळवी यांनी म्हटलं आहे. 'शिवसेना भवन'ला हात लावणं म्हणजे देवेंद्र फडणवीसांचे पाय चेपण्याइतकं सोप्पं आहे असं काही भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे,' अशी बोचरी टीकाही साळवी यांनी केली आहे. 'शिवसेना भवन हे आम्हा शिवसैनिकांचं मंदिर आहे आणि यात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींचा सुगंध आहे. आमदार प्रसाद लाड हे शिवसेनेच्या मतांंवर विधानपरिषद निवडणुक जिंकले आहेत. त्यांच्यावर शिवसेनेचे व शिवसेना भवनाचे उपकार आहेत. त्यांच्या तोंडी शिवसेना भवन फोडण्याची भाषा शोभत नाही,' असंही साळवी यांनी सुनावलं. प्रसाद लाड यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी विधानपरिषद आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरं जाऊन दाखवावं. आमचे शिवसैनिक तुम्हाला पराभवाच्या लाडूचा प्रसाद दिल्याशिवाय शांत बसणार नाहीत,' असं थेट आव्हानच आमदार राजन साळवी यांनी दिलं आहे. काय म्हणाले होते प्रसाद लाड? भाजपच्या माहीम कार्यालयाबाहेर शनिवारी पक्षाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी लाड यांनी शिवसेनेवर टीका केली होती. राणे कुटुंबीयांना मानणारे कार्यकर्ते भाजपमध्ये आल्यामुळं भाजपची ताकद दुप्पट झाली आहे. ते (शिवसैनिक) घाबरून गेले आहेत. आपण नुसते माहीममध्ये आलो तरी शिवसेना भवन फोडायला आलो आहोत, असंच त्यांना वाटतं. पण वेळ आली तर ते देखील करू,' असं लाड म्हणाले होते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2V1zP2J

No comments:

Post a Comment