मुंबई: ज्येष्ठ गीतकार यांच्या कथित बदनामीच्या प्रकरणात अंधेरी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने मंगळवारी अभिनेत्री हिला अखेरची संधी देत १ सप्टेंबर रोजीच्या पुढील सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले. तसेच त्यादिवशी कंगना हजर न राहिल्यास तिच्याविरोधात वॉरंट जारी करण्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुभा अख्तर यांना दिली. ( ) वाचा: 'अभिनेता याच्या मृत्यूनंतर रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक यांनी घेतलेल्या मुलाखतीत कंगनाने माझ्याविरोधात बिनबुडाचे आरोप केले. तसेच माझी नाहक बदनामी करणारी विधाने केली', अशी तक्रार अख्तर यांनी केली आहे. याविषयीच्या पोलिसांच्या अहवालाची दखल घेऊन न्यायालयाने कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. पूर्वी एकदा समन्स बजावूनही कंगना हजर न राहिल्याने न्यायालयाने तिच्याविरोधात वॉरंट काढले होते. त्यानंतर तिने न्यायालयात हजेरी लावून जामीन मिळवला होता. मंगळवारी या प्रकरणाची पुन्हा सुनावणी असताना कंगनाच्या वकिलांनी या एका दिवसापुरती गैरहजेरीची मुभा देण्याची विनंती करणारा अर्ज सादर केला; तर काढावे, अशा विनंतीचा अर्ज अख्तर यांच्या वकिलांनी दिला. वाचा: 'कंगना मुंबईत नसल्याने सुनावणीला हजर राहू शकली नाही. त्यामुळे गैरहजेरीविषयी मुभा द्यावी', असे म्हणणे तिच्या वकिलांनी मांडले. त्याला अख्तर यांच्या वकिलांनी विरोध दर्शवला. 'कंगना यापूर्वी केवळ जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात हजर राहिली होती. त्याव्यतिरिक्त ती सुनावणीच्या एकाही तारखेला हजर राहिलेली नाही', असे अख्तर यांच्या वकिलांनी निदर्शनास आणले. त्यानंतर न्यायालयाने अख्तर यांचा अर्ज फेटाळला. मात्र, पुढील सुनावणीलाही कंगना गैरहजर राहिल्यास त्यांना पुन्हा अर्ज करण्याची मुभा दिली. तसेच कंगनाला मंगळवारच्या एका दिवसापुरती गैरहजेरीची मुभा देऊन पुढील सुनावणीला हजर राहण्याचेही निर्देश दिले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2TBVayK
No comments:
Post a Comment