नवी दिल्ली : सोमवारी केंद्रशासित प्रदेश लेह-लडाखला पुन्हा एकदा जाणवला. ''कडून मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता ४.६ रिश्टर स्केलरिश्टर स्केल मोजण्यात आलीय. भूकंपामुळे कोणत्याही नुकसानीचं वृत्त अद्याप नाही. गेल्या महिन्यातही लडाखला अनेकदा भूकंपाचे झटके बसले होते. तसंच गेल्या महिन्यात सलग दोन दिवस २१ मे आणि २२ मे रोजी लडाखला भूकंपाचा धक्का बसला होता. या भूकंपाची तीव्रता ४.२ आणि ३.६ रिश्टर स्केल अशी मोजण्यात आली होती. आज जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता अगोदरपेक्षा जास्त असल्याचं दिसून येतंय. जम्मू-काश्मीरलाही भूकंपाचा धक्का तसंच १ जून रोजी जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यालालही भूकंपाचा धक्का बसला होता. दुपारी ३.४७ मिनिटांनी जाणवलेला हा भूकंपाचा धक्का ३.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. यामुळे बरेच नागरिकही धास्तावले होते. आणि लडाख हा भाग भूकंपप्रवण क्षेत्रात येतो. भूकंपाची शक्यता अधिक असल्यानं नागरिकांना सतत अलर्ट राहण्याची सूचना केली जाते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2T4lEJf
No comments:
Post a Comment