Breaking

Friday, July 30, 2021

शनिवारी भारताला तीन खेळांमध्ये पदकांची अपेक्षा; असं आहे खेळाडूंचं वेळापत्रक https://ift.tt/3zPX3HC

Tokyo Olympic 2020 : टोकियो : टोकियो ऑलिम्पिकचं उद्घाटन होऊन आज आठवडा पूर्ण झाला. स्पर्धाही निम्म्या टप्प्यात आली आहे. खेळाच्या महाकुंभाचा अर्धा भाग अजून शिल्लक आहे. आतापर्यंत भारताच्या खात्यात दोन पदके निश्चित झाली आहेत. आणि आणखी काही पदके जमा होऊ शकतात. त्यामुळे शनिवार (31 जुलै) भारतासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. शनिवारी भारतीय खेळाडू तिरंदाजी, बॉक्सिंग, बॅडमिंटन, हॉकी, शूटिंग आणि सेलिंगसारख्या खेळांमध्ये भाग घेतील. तसेच अॅथलेटिक्समध्येही भारतीय खेळाडूंचा सहभाग दिसेल. भारताला शनिवारी बॅडमिंटन, तिरंदाजी आणि नेमबाजीत पदकांची आशा असेल. अतानू दासवर राहणार नजर पुरुष तिरंदाजीत भारताचा अतानू दास त्याचा पुढील सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल. येथे त्याचा सामना जपानच्या तिरंदाजाशी होणार आहे. त्यानंतर उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम सामना होणार आहे. तसेच पुरुष सांघिक स्पर्धेचे सामनेही होतील. सिंधू आणि पूजा पदकाच्या समीप महिलांच्या बॅडमिंटन एकेरीत पी.व्ही. सिंधूवर सर्वांची नजर असेल. ती तिचा उपांत्य सामना खेळताना दिसेल. दुसरीकडे नेमबाजीमध्ये महिलांच्या 50 मीटर 3 पोझिशनच्या स्पर्धा होतील, ज्यामध्ये सर्वांचं लक्ष असेल अंजुम मौदगिल आणि तेजस्विनी सावंत यांच्यावर. तर बॉक्सिंगच्या रिंगमध्ये पुरुष बॉक्सर अमित पंघल देखील उतरणार आहे. भारताला बॉक्सिंगमधून आणखी एक पदक मिळण्याची शक्यता आहे. महिला बॉक्सर पूजा राणीने शनिवारचा सामना जिंकला तर लव्हलिनापाठोपाठ पूजाही ऑलिम्पिक पदकाची मानकरी ठरेल. महिला हॉकी संघाला विजय आवश्यक 31 जुलै रोजी हॉकीच्या मैदानात भारतीय महिला खेळा़डूंना विजय मिळणे आवश्यक आहे. जर भारताला उपांत्यपूर्व फेरी गाठायची असेल, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. तसेच दुसरीकडे आयर्लंडने सामना गमवावा यासाठीही प्रार्थना करावी लागणार आहे. सेलिंगमध्ये के.सी.गणपती आणि वरुण ठक्कर, गोल्फमध्ये अनिर्बान लाहिरी आणि उद्यन माने तर घोडेस्वारीत फवाद मिर्झा आपले कौशल्य पणाला लावतील. त्यामुळे शनिवारी आता भारतीय खेळाडूंची कशी कामगिरी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3fdwQuW

No comments:

Post a Comment