म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापूर परिस्थितीची पाहणी करून पूरग्रस्तांची संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस रात्री कोल्हापुरात दाखल झाले आहेत. (chief minister uddhav thackeray will inspect the and shirol today) गेल्या आठवड्यात कोल्हापुरात मोठा महापूर आला होता. यामध्ये चारशे अकरा गावांना महापुराने वेढले , कोल्हापूर शहरात पाणी घुसले. पुरामुळे जिल्ह्याला मोठा फटका बसला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे हे पूरग्रस्तांशी संवाद साधण्यासाठी उद्या सकाळी कोल्हापुरात येत आहेत. ते शिरोळ आणि कोल्हापूर शहरातील पूरस्थिती पाहणी करून आढावा बैठक घेणार आहेत. क्लिक करा आणि वाचा- गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. मात्र मात्र जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केल्यामुळे रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द करण्यात आला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मात्र नियोजित दौऱ्यानुसार जिल्ह्यात दाखल झाले आहेत. दरम्यान, सांगली जिल्ह्यात दिवसभर पूर परिस्थितीची पाहणी करून विरोधी पक्षनेते फडणवीस रात्री मुक्कामाला आले आहेत. ते देखील शुक्रवारी शहरातील विविध पूरग्रस्त ठिकाणी भेट देऊन पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री दोघेही शुक्रवारी कोल्हापुरात असल्याने पूरग्रस्तांना मदतीची अपेक्षा वाढली आहे. क्लिक करा आणि वाचा- फडणवीस याची राज्य सरकारवर टीका पूरग्रस्तांना देण्याच्या मदतीबाबत राज्य सरकार बहाणेबाजी करत असून आता सरकारने ही बहाणेबाजी बंद करावी. स्वत:ची जबाबदारी झटकून देणे चुकीचे आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. आम्ही सत्तेत असताना केंद्राच्या मदतीची वाट पाहिली नाही. आम्ही महाराष्ट्राच्या ताकदीवर मदत केली होती. आता राज्य सरकारनेही केंद्र सरकारकडे बोट दाखवू नये, स्वत: मदत करावी, असे आवाहन फडणवीस यांनी राज्य सरकारला केले आहे. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3xdC0x4
No comments:
Post a Comment