Breaking

Sunday, August 1, 2021

इटलीचा जॅकोब बनला उसेन बोल्टचा उत्तराधिकारी; १०० मीटरची शर्यत जिंकली https://ift.tt/2V3LdLv

टोकियो : इटलीच्या लामोंट मार्सेल जॅकोब्सने टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये 100 मीटर शर्यतीत सुवर्ण जिंकत इतिहास रचला आणि महान धावपटू उसेन बोल्टला त्याचा उत्तराधिकारी मिळाला. अतिशय रोमांचक ठरलेल्या या शर्यतीत फ्रेड केर्लीने रौप्य पदक, तर आंद्रे डी ग्रासेकडे कांस्य पदक गेले. वाचा- संपूर्ण जगाच्या नजरा या शर्यतीकडे लागल्या होत्या. सर्वच क्रीडाप्रेमींपासून ते आजी-माजी खेळाडूंना ही शर्यत पाहायची होती. जमैकाचा महान धावपटू आणि मानवी इतिहासातील सर्वात वेगवान माणूस उसेन बोल्टनंतर ऑलिम्पिक 100 मीटर शर्यत कोण जिंकणार याचीच वाट सगळे पाहत होते. बोल्ट स्वतः या शर्यतीवर नजर ठेवून होता. त्याचा विश्वविक्रम कुणी मोडणार नाही, असंही त्यानं बोलून दाखवले होते. आणि तसंच घडलंही. वाचा- पहिल्या उपांत्य फेरीत अमेरिकेच्या फ्रेड केर्लीने 9.96 सेकंद तर कॅनडाच्या आंद्रे डी ग्रासेनं 9.98 सेकंद वेळ नोंदवत अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले. नायजेरियाच्या एनोच अडेगोके आणि ग्रेट ब्रिटनच्या झर्नेल ह्यूजेस दुसऱ्या उपांत्य फेरीतून अंतिम फेरीत पोहोचले. अॅथलेटिक्स विश्वाला चकित केलं ते पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाच्या एसयू बिंगटियनने. त्याने 9.83 सेकंदासह सुवर्ण पदकाचा दावेदार मानल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या रुनी बेकरची बरोबरी साधली. वाचा- याशिवाय, दक्षिण आफ्रिकेच्या अकानी सिम्बाईन आणि इटलीच्या लामोंट जॅकोब्सने पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीच्या अंतिम फेरीत जागा पक्की केली. 2000 च्या सिडनी ऑलिम्पिकनंतर पहिल्यांदाच पुरुषांच्या 100 मीटरमध्ये एकाही जमैका धावपटूने भाग घेतला नाही. वाचा- गेल्या तीन ऑलिम्पिकमध्ये जमैकाच्या उसेन बोल्टने एकहाती सत्ता राखली होती. त्याने निवृत्ती घेतल्यानंतर नव्या चॅम्पियनच्या शोधात सगळे होते. दरम्यान, जॅकोबने या वर्षीच्या मे महिन्यात 9.95 सेकंद वेळ नोंदवत नवा इटालियन विक्रम केला होता.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2VaC0AV

No comments:

Post a Comment