Breaking

Tuesday, August 31, 2021

तिसऱ्या लाटेचा धोका, रुग्णालयांची क्षमता वाढवण्यावर भर : अर्थमंत्री https://ift.tt/2V9ohdK

नवी दिल्ली : करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर केरळसहीत इतर काही राज्यांची चिंता वाढलेली दिसून येतेय. काही जणांकडून करोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात म्हणून या संक्रमणाच्या वाढलेल्या आकड्याकडे पाहिलं जातंय. अशा वेळी सरकारकडून आरोग्यव्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातोय. यांनीही नुकतंच या परिस्थितीवर भाष्य केलंय. करोना संक्रमणाची तिसरी लाट रोखण्यासाठी किंवा त्याचा परिणाम कमीत कमी व्हावा यासाठी हरएक संभाव्य प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत, असं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटलंय. करोनाच्या पार्श्वभूमीवर देशाची आरोग्य व्यवस्था मजबूत करण्याची आवश्यकता आहे. याचाच एक भाग म्हणून देशात करोना लसीकरणाचा वेग वाढवण्यावर भर दिला जातोय. तसंच देशाला प्रशिक्षित डॉक्टर आणि नर्सेस सोबतच चाचणी सुविधांची आणखीन गरज भासू शकते, असं सांगतानाच लहान आणि मध्यम दर्जाच्या शहरांत वाढवण्याची गरजही अर्थमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. करोनामुळे प्रभावित झालेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी आरोग्य सुविधा मजबूत करण्याच्या संदर्भात एका वेबिनारला संबोधित करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हे वक्तव्य केलंय. 'हजार व्यक्तींमागे एक बेड' याच वेबिनारमध्ये बोलताना, नीती आयोगाचे सदस्य आणि करोनाशी निगडीत टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. व्ही के पॉल यांनी रुग्णालयात रुग्णांसाठी बेडची संख्या खूपच कमी असल्याची उणीव व्यक्त केली. तुलनात्मक आकडा देताना डॉ. पॉल यांनी देशात सध्या एक हजार व्यक्तींमागे फक्त एक बेड उपलब्ध असणं ही चिंतेची बाब असल्याचं म्हटलंय. हजार व्यक्तींमागे कमीत कमी दोन बेड उपलब्ध असणं गरजेचं असल्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली. सध्या बेडसची संख्या जवळपास १२ लाख आहे ही संख्या २४-२५ लाखांपर्यंत नेण्याची गरज डॉ. पॉल यांनी व्यक्त केली. '६० हजारांहून अधिक व्हेन्टिलेटर' या वेबिनारमध्ये उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी, सरकारकडून करोना परिस्थितीच्या सुरुवातीपासूनच आरोग्य व्यवस्था वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं म्हटलंय. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल सात दशकांत देशातील रुग्णालयात जवळपास १६ हजार व्हेन्टिलेटरची सुविधा होती तिथंच गेल्या दीड वर्षांत ही संख्या ६० हजारांहून अधिक करण्यात आल्याचं राजेश भूषण यांनी म्हटलंय.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2WCh2LC

No comments:

Post a Comment