म. टा. प्रतिनिधी, मुंबई आपल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सरकारच्या निधीवर अवलंबून असलेल्या राज्य परिवहन महामंडळाकडून करोना तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी अॅँटिमायक्रोबायल कोटिंगनंतर आता लॅबसाठी निविदा मागवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या लॅबकडे एसटी कोटिंगची परिणामकारकता तपासण्याचे काम असणार आहे. करोना रोखण्यासाठी महामंडळाच्या सर्व बसला आंतर्बाह्य कोटिंग करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. या कोटिंगने खरेच मरतो का हे कोडे सोडवण्यासाठी महामंडळाकडून दोन खासगी लॅबची नियुक्ती करण्यात येणार आहे. मानवी स्वॅबच्या धर्तीवर एसटी गाड्यांची देखील तपासणी करण्यात येणार आहे. कोटिंग केल्यानंतर गाड्यांची तपासणी होईल, त्यावेळी करोना परिणामकारकता तपासण्यात येईल. तसेच अहवाल निगेटिव्ह आल्यास संबंधित कोटिंग करणाऱ्या कंपनीला मोफत पुन्हा बसवर कोटिंग करून देणे बंधनकारक असणार आहे. दोन खासगी कंपन्यांसाठी दोन स्वतंत्र लॅब असणार आहेत. राज्यात ज्या ठिकाणी गाड्या आहेत, त्या ठिकाणी लॅब कर्मचारी जाऊन गाड्यांची तपासणी करणार आहेत. सध्या लॅब नियुक्त करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. हे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याचे सांगत महामंडळाने लॅब नियुक्त करण्यासाठीच्या खर्चाबाबत बोलणे टाळणे. करोनाच्या पहिल्या लाटेत साबणाच्या फेसयुक्त पाण्याने बस आंतर्बाह्य स्वच्छ धुण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता. दुसऱ्या लाटेदरम्यान निर्बंधात शिथिलता आल्यानंतर अनेक गाड्यांमध्ये अस्वच्छता कायम असल्याची प्रवाशांची तक्रार होती. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त लसीकरण करणे, करोना संसर्ग रोखणाऱ्या नियमांचे पालन करणे यावर भर असताना एसटी महामंडळाने अँटिमायक्रोबायल केमिकल कोटिंगचा पर्याय निवडला आहे. यंदाही पगार विलंबाने? कोकणासह रायगड, पालघर, पश्चिम महाराष्ट्र, सातारा, सांगली, कोल्हापूर येथे झालेला मुसळधार पाऊस आणि दरडी कोसळल्याच्या घटनांमुळे अनेक ठिकाणी प्रचंड नुकसान झाले. याची झळ महामंडळाची स्थानिक कार्यालये आणि स्थानक-आगारांना बसली. परिणामी या जूलैचा पगार ७ ऑगस्टपूर्वी देण्यासाठी सरकारकडे निधीची मागणी करण्यात आली आहे. सध्याची स्थिती पाहता यंदाही पगार विलंबाने होण्याची शक्यता आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3A3AKhH
No comments:
Post a Comment