Breaking

Monday, August 2, 2021

सरकारी बंगल्यांचा मोह; देशमुख, राठोड,पटोले यांचा मुक्काम कायम https://ift.tt/3ylxIoG

मुंबई : वैधानिक पदाचा राजीनामा देऊन काही महिने लोटले तरी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते , माजी वनमंत्री आणि शिवसेनेचे नेते तसेच माजी विधानसभाध्यक्ष आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी त्यांचे सरकारी निवासस्थान अद्याप सोडलेले नाही. माजी मंत्री स्वतःहून बंगला सोडत नसल्याने नियमानुसार सामान्य प्रशासन विभागाने त्यांना नोटीस बजावण्याबाबत गेल्या महिन्यात प्रस्ताव तयार करून तो मुख्यमंत्री कार्यालयाकडे कार्यवाहीसाठी पाठवला. मात्र, मुख्यमंत्री कार्यालयाने त्यावर कोणताच निर्णय न घेता तो परत पाठवला. सरकारी बंगले न सोडण्यातही या तिन्ही सत्ताधारी पक्षांमधील नेत्यांनी आघाडी दाखविल्याने त्यांच्या ताब्यातील हे सरकारी बंगले रिकामे करायचे की नाहीत, अशा कात्रीत सामान्य प्रशासन विभाग अडकल्याचे दिसते. पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ४ फेब्रुवारीला विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पटोले यांना विधानसभाध्यक्ष म्हणून मंत्रालयासमोरील 'अ-९' हा बंगला मिळाला होता. त्यांनी राजीनामा देऊन जवळपास सहा महिने झाले तरी सरकारी निवास्थानातील मुक्काम हलवलेला नाही. वादात अडकलेल्या राठोड यांनी २८ फेब्रुवारीला वनमंत्रिपदाचा राजीनामा दिला. वनमंत्री असताना त्यांना मंत्रालयासमोरील 'क ८' हा बंगला देण्यात आला होता. सध्या या बंगल्याचे नूतनीकरण सुरू आहे. राठोड या बंगल्यात राहत नसले तरी त्यांनी सोडल्याचे सामान्य प्रशासन विभागाला लेखी कळविलेले नाही. देशमुख यांना ५ एप्रिलला गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. राजीनामा देऊन चार महिने होत आले तरी देशमुख यांचा मलबार हिलच्या 'ज्ञानेश्वरी' बंगल्यावरील मुक्काम कायम आहे. दंड वसुलीचे काय? नियमानुसार संबंधित व्यक्तीने पदावरून बाजूला झाल्यानंतर १५ दिवसांत त्यांच्या ताब्यातील सरकारी बंगला रिकामा करून त्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाला द्यावी लागते. १५ दिवसांच्या मुदतीत बंगला रिकामा न केल्यास प्रतिमहिना २०० रुपये प्रतिचौरस फूट या दराने सामान्य प्रशासन विभागाकडून दंड वसूल केला जातो. त्यामुळे नोटीस बजावून दंडात्मक कारवाई करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने प्रस्ताव पाठवूनही मुख्यमंत्री कार्यालयाने त्याची दखल न घेतल्याची खात्रीशीर माहिती आहे. सरकारी निवासस्थान आणि क्षेत्रफळ ज्ञानेश्वरी-४,३४७ चौरस फूट 'अ-९'- ३०४१.४२ चौरस फूट 'क-८'-१०४९ चौरस फूट


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3llugXz

No comments:

Post a Comment