Breaking

Tuesday, August 31, 2021

मराठवाड्यात अतिवृष्टी; राष्ट्रवादीने तातडीने घेतला 'हा' निर्णय https://ift.tt/2WCPWEi

बीड: जिल्ह्यातील माजलगाव, गेवराई, बीड यांसह काही तालुक्यांमध्ये सोमवारी सायंकाळपासून मुसळधार पाऊस पडत असून, बहुतांश भागात अजूनही पाऊस सुरू आहे तसेच काही तालुक्यात आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे; या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने २४ तास सतर्क राहून आवश्यक तिथे मदत कार्य करावे अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी दिल्या आहेत. दरम्यान, विभागात अनेक भागांत अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ( ) वाचा: बीडमध्ये अनेक ठिकाणी खरीप पिकांचे व फळ बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पावसाने उघडीप देताच विमा कंपनी, महसूल व कृषी विभागामार्फत पंचनामे करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येईल. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा व मदत देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. काही गावांचा संपर्क तुटल्याचेदेखील वृत्त येत आहे, त्यामुळे आधी नागरिकांच्या सुरक्षा उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज रहावे, कुठेही जीवित किंवा वित्त हानी होणार नाही या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश मुंडे यांनी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांना दिले आहेत. पावसाचा तडाखा पूर्णपणे कमी होईपर्यंत नागरिकांनी काळजी घ्यावी, धोक्याचे ठिकाण, जलाशय, वाहत्या नद्या अशा ठिकाणी जाण्याचे टाळावे व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही मुंडे यांनी जिल्हावासियांना केले आहे. वाचा: राष्ट्रवादीचे सर्व कार्यक्रम स्थगित अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर पक्षाचे सर्व संघटनात्मक व राजकीय कार्यक्रम स्थगित करून पक्षसंघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मदतकार्यासाठी पुढाकार घ्यावा, असे निर्देश प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री यांनी दिले आहेत. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3kMh7VE

No comments:

Post a Comment