Breaking

Friday, August 27, 2021

इंग्लंडला हटवा आणि कसोटी क्रिकेटला वाचवा; व्हिडीओमध्ये पाहा नेमकं घडलं तरी काय... https://ift.tt/2XSqcnN

हेडिंग्ल : तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली. पण भारत फलंदाजी करत असताना, 'इंग्लंडला हटवा आणि कसोटी क्रिकेटला वाचवा' असा एक संदेश झळकल्याचे सर्वांनीच पाहिले. नेमकं घडलं तरी काय, पाहा...ही घटना घडली ती भारतीय संघ फलंदाजी करत असताना २५व्या षटकात. त्यावेळी रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा फलंदाजी करत होते. यावेळी सामना सुरु असताना मैदानावरुन एक विमान उडाले आणि त्या विमानाच्या मागे एक संदेश लिहिला होता आणि तो वाचताही येत होता. या संदेशामध्ये लिहिण्यात आले होते की, " इंग्लंड क्रिकेट मंडळाला हटवा आणि कसोटी क्रिकेटला वाचवा..." तिसऱ्या दिवसअखेर भारताने २ बाद २१५ अशी मजल मारली असून ते अजूनही १३९ धावांनी पिछाडीवर आहेत. रोहित आणि पुजारा या दोघांनी अर्धशतकी खेळी साकारत संघाला चांगली धावसंख्या रचून दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी रचली. पण रोहित शर्मा यावेळी दुर्देवी ठरला. रोहितने दमदार अर्धशतक साजरे केले, पण रोहितला यावेळी ५९ धावांवरच समाधान मानावे लागले. त्यानंतर पुजारा आणि कोहली यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९९ धावांची अभेद्य भागीदारी रचली आहे. पुजारा यावेळी नाबाद ९१ धावांवर खेळत आहे, पुजाराने ९१ धावांची खेळी साकारताना १५ चौकार फटकावले आहेत. कोहली यावेळी नाबाद ४५ धावांवर खेळत असून त्याच्या नावावर सहा चौकार आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2UVAySU

No comments:

Post a Comment