Breaking

Monday, August 30, 2021

रस्त्यात पत्नीसोबतचा वाद विकोपाला गेल्याने पतीने चिरला स्वत:चाच गळा! https://ift.tt/38nKrMc

औरंगाबाद: मध्यवर्ती बसस्थानक परिसरात एकाने स्वतःचा गळा कापून (Suicide Attempt Case) केल्याची घटना मध्यरात्री घडली. या घटनेची माहिती मिळताच क्रांती चौक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सदर व्यक्तीला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक जोडपं मध्यवर्ती बस स्थानकात आलं होतं. या दोघांमध्ये वादावादी सुरू होती. काही काळानंतर हा वाद आणखीनच वाढला आणि संबंधित व्यक्तीने रागाच्या भरात स्वतःचा गळा चिरला. या पुरुषासोबत असलेल्या महिलेने ही घटना पाहताच आरडाओरडा करून आसपासच्या लोकांना जमवलं. मध्यवर्ती बस स्थानकातील पोलीस व वाहतूक पोलीस यांनी पुढाकार घेत सदर व्यक्तीला उपचारासाठी घाटी रुग्णालय दाखल केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर व्यक्ती आणि महिला हे दोघे पती-पत्नी असून काही कौटुंबिक वादामुळे सदर व्यक्तीने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, जखमी व्यक्तीवर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर झाल्यानंतर जबाब घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती क्रांती चौक पोलिसांनी दिली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3DvpxZV

No comments:

Post a Comment