Breaking

Tuesday, August 3, 2021

पुण्यातील टिळक रस्त्यावर मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा; पोलीस येताच... https://ift.tt/3AatLDB

पुणे: शहरातील टिळक रस्त्यावरील परिसरात एका मद्यधुंद तरुणीने मंगळवारी रात्री भररस्त्यात अनेक वाहनांना अटकाव करत धिंगाणा घातला. हा ड्रामा बराच वेळ सुरू होता. काही सजग नागरिकांनी नियंत्रण कक्षाला फोन करून याबाबत कळविल्यानंतर तरुणीला पोलिसांनी रस्त्यावरून बाजूला हटवले आणि पोलीस ठाण्यात नेले. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ( ) वाचा: टिळक रस्त्यावर रात्री साडेदहाच्या सुमारास एक तरुणी मद्यधुंद अवस्थेत भररस्त्यात उभी राहून गोंधळ घालत होती. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांसमोर बसून वाहने अडविण्याचा प्रयत्न करत होती. तरुणीच्या या झिंगाट कृतीने रस्त्यावर गर्दी झाली. मग नागरिकांनी तत्काळ याची माहिती येथे दिली. त्यानंतर खडक पोलिसांना तत्काळ कळविण्यात आले. तातडीने घटनास्थळी पोहचले व त्यांनी तरुणीला रस्त्याच्या बाजूला काढले. तिला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून तरुणीबद्दल अधिक माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. वाचा: नेमकं काय घडलं? टिळक रस्त्यावरील हिराबाग चौक परिसरातील प्रकार सर्वांनाच धक्का देणारा होता. दारूच्या नशेत असलेली एक तरुणी रस्त्याच्या मधोमध येऊन धिंगाणा घालत होती. रस्त्यावर बसत तिने गाड्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. माझ्या अंगावरून गाडी न्या असेही ती ओरडत होती. काहींनी तिला रस्त्यावरून बाजूला जाण्यासाठी विनंती केली मात्र ती ऐकायला तयार नव्हती. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. पोलीस आले आणि मग या तरुणीला गपगुमान त्यांच्यासोबत जावं लागलं. ही तरुणी कोण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3luaKYH

No comments:

Post a Comment