Breaking

Tuesday, August 3, 2021

...म्हणून सांगलीत प्रवाशांनी अडवल्या कर्नाटकच्या बस https://ift.tt/2TQKxbt

: करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने प्रवाशांसाठी आरटीपीसीआर टेस्टचा निगेटिव्ह अहवाल किंवा लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक केले आहे. या निर्णयामुळे सीमाभागातील सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यातून कर्नाटकात ये-जा करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. याचवेळी कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांवर मात्र कोणतेही निर्बंध नाहीत. यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी मंगळवारी बस स्थानकात कर्नाटकच्या बस अडवून ठेवल्या. कर्नाटक सरकारने तातडीने नियम बदलल्याशिवाय त्यांच्या बसेस सोडणार नाही, असा पवित्रा प्रवाशांनी घेतल्याने मिरज बस स्थानकात गोंधळ उडाला. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या बसमध्ये प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्टचा निगेटिव्ह अहवाल असल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. याचा फटका सीमाभागातील प्रवाशांना बसत आहे. कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना कोणतेही निर्बंध लावलेले नाहीत. मात्र त्याच बसमधून पुन्हा कर्नाटकात जाताना निगेटिव्ह अहवाल किंवा लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे बंधनकारक केले आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारे प्रवासी संतापले आहेत. मिरज डेपोत मंगळवारी सकाळपासून अनेक प्रवासी कर्नाटकात जाण्यासाठी थांबले होते. मात्र कर्नाटकातील बसचालक आणि वाहकांनी त्यांना बसमध्ये प्रवेश दिला नाही. यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी कर्नाटकच्या बस अडवून ठेवत जाब विचारला. कर्नाटक सरकारने निर्णय बदलल्याशिवाय बस सोडणार नाही, असा पवित्रा प्रवाशांनी घेतला. सांगली, मिरज, सोलापूर, कोल्हापूर ही शहरे दोन्ही राज्यातील नागरिकांसाठी महत्त्वाच्या बाजारपेठा आहेत. याशिवाय वैद्यकीय सुविधांसाठी दोन्ही राज्यातील प्रवाशांची ये-जा सुरू असते. या स्थितीत समन्वयाने निर्णय घेण्याऐवजी कर्नाटक सरकारकडून नागरिकांची अडवणूक केली जात आहे. एकतर्फी निर्णय घेतल्याने महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या मार्गांवर प्रवाशांची वाहने अडकून पडली आहेत. याबाबत कर्नाटक सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3lrDrFO

No comments:

Post a Comment