नागपूर: केंद्रीय परिवहन मंत्री (Nitin Gadkari) यांच्या ताफ्यातील वाहन ट्रकवर धडकल्याने प्रचंड खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. अपघाताची पाहणी केल्यानंतर गडकरी निवासस्थानाकडे रवाना झाले. ही घटना शनिवारी रात्री छत्रपती चौकात घडली. वृत्त लिहिपर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती. (a car of convoy collided with a truck ) मिळालेल्या माहितीनुसार, सोनेगाव तलाव सौंदर्यीकरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी गडकरी हे सोनेगाव येथे गेले. कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री गडकरी हे सात वाहनांच्या ताफ्यासह निवासस्थानाकडे जात होते. छत्रपती चौकात सिग्नलवर लाल दिवा लागल्याने ट्रकचालकाने अचानक ब्रेक दाबला. ताफ्यातील पहिल्या क्रमांकावर असलेले एमएच-०१-सीपी-२४३५ या क्रमांकाचे वाहन ट्रकवर आदळले. यात वाहनाचा समोरील भाग चक्काचूर झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. क्लिक करा आणि वाचा- जोरदार आवाज झाल्याने नागरिकांनी धाव घेतली. सुरक्षा रक्षकही वाहनातून बाहेर आले. त्यानंतर घटनेची माहिती घेत गडकरी निवासस्थानाकडे रवाना झाले. या अपघाताची माहिती मिळताच प्रतापनगर व धंतोली पोलिसांचा ताफा छत्रपती चौकात पोहोचला. उशीरारात्रीपर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3Dl3THP
No comments:
Post a Comment