Breaking

Sunday, August 29, 2021

हृदयद्रावक! आजाराला कंटाळून जळगावात तरुणाची आत्महत्या https://ift.tt/3DrZqD0

म.टा प्रतिनिधी, जळगाव पोटाच्या विकाराने त्रस्त झालेल्या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी सकाळी ८ वाजता सिंधी कॉलनीत ही घटना उघडकीस आली.रोहन इंदरकुमार मेहता (२४) असे मृत तरुणाचे नाव आहे. ( in jalgaon due to illness) रोहनच्या कुटुंबीयांचे बळीरामपेठेत साडीचे दुकान आहे. याच दुकानावर रोहन व्यवसाय करीत होता. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून पोटाच्या विकारामुळे तो त्रस्त झाला होता. कुटुंबीयांनी अनेक रुग्णालयांमध्ये उपचार देखील केले होते. तरी देखील त्याचा त्रास कमी झालेला नव्हता. दरम्यान, नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी ८ वाजता रोहन झोपेतून उठला. काही वेळ त्याने वृत्तपत्र वाचले. यावेळी कुटुंबीय कामानिमित्त घराबाहेर गेल्यानंतर रोहनने बेडरुमध्ये जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. आई सुनिता ह्या घरात आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. रोहनने गळफास घेतल्याचे पाहून त्यांना जबर धक्का बसला. क्लिक करा आणि वाचा- रोहनच्या पश्चात वडील, आई, भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3ypokPV

No comments:

Post a Comment