नवी दिल्लीः संसदेचं पावसाळी अधिवेश सुरू आहे. पेगासस हेरगिरी प्रकरणावरून संसदेत विरोधकांचा गदारोळ सुरू आहे. सरकारची कोंडी करण्यासाठी विरोधी पक्षांच्या बैठका होत आहेत. अशातच शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. संजय राऊत यांनी स्वतः ट्वीट करून या भेटीची माहिती ( ) दिली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास सव्वा तास बैठक चालल्याचं सांगण्यात येतंय. राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यांच्याशी महाराष्ट्रातील आणि राष्ट्रीय राजकारणावर सविस्तर चर्चा केली. राज्य सरकारच्या कामाविषयी राहुल गांधी यांनी समाधान व्यक्त केलं, असं संजय राऊत ट्वीटमध्ये म्हणाले. एवढचं नव्हे तर राहुल गांधी यांनी शिवसेनेची जडणघडण आणि कार्यपद्धतीबाबतही जाणून घेतलं, असं राऊत यांनी सांगितलं. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस सहभागी आहे. पण मुंबईतील आगामी महापालिका निवडणूक आणि महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्षपदी नाना पटोले यांची निवडीनंतर राज्यात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. नाना पटोले राज्यात पक्ष संघटना बळकट करत आहेत. नाना पटोले यांच्या वक्तव्यांमुळे गेल्या काही दिवसांत महाविकास आघाडीत अस्वस्था निर्माण झाली होती. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाराजीही व्यक्त केली गेली होती. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी राहुल गांधींची घेतलेली भेट ही महत्त्वाची असल्याचं बोललं जातंय. संजय राऊत यांनी दिल्ली राहुल गांधींची भेट घेतल्याने महाराष्ट्रात राजकीय चर्चांना उधाण आहे. राऊत यांनी राहुल गांधींच्या भेटीची माहिती दिली असली तरी या भेटी मागचं नेमकं कारण काय होतं? हे अद्याप कळलेलं नाही. यामुळे महाराष्ट्रात या भेटीवरून चर्चा रंगली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3AgZSlt
No comments:
Post a Comment