मुंबई: संसर्गाबाबत मुंबईकरांसाठी दिलासादायक वृत्त असून सोमवारी दैनंदिन करोना बाधितांच्या रग्णसंख्येत घट झाली आहे. आज दिवसभरात एकूण २५९ नव्या रुग्णांचे निदान झाले असून ३९१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या बरोबरच मुंबईत सक्रिय रुग्णांच्या संख्येतही घट झाली असून मुंबईत एकूण ४ हजार ७४४ रुग्ण उपचार घेत आहेत. मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख ३५ हजार ३७१ जणांना करोना विषाणूची लागण झाली असून बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ७ लाख १२ हजार ३११ इतकी आहे. या बरोबरच बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ९७ टक्क्यांवर स्थिर आहे. मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून तो १ हजार ५०० दिवसांवर पोहोचला आहे. तसेच आज दिवसभरात एकूण ९ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण १५ हजार ९०८ इतक्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. क्लिक करा आणि वाचा- मुंबईत दिवसभरात झाल्या २६ हजार ७६८ चाचण्या मुंबईत आज दिवसभरात एकूण २६ हजार ७६८ इतक्या करोना चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत एकूण ८२ लाख १२ हजार ३०१ चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. मुंबई जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के इतका असून २६ जुलै ते ०१ ऑगस्ट २०२१ या कालावधीत मुंबईतील कोविड वाढीचा दर ०.०५ टक्क्यांवरच स्थिर आहे. मुंबईत सध्या सक्रिय कंटेनमेंट झोनची संख्या ३ असून सक्रिय सीलबंद इमारची ४६ आहेत. क्लिक करा आणि वाचा- मुंबईतील संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची स्थिती २४ तासात बाधित रुग्ण - २५९ २४ तासात बरे झालेले रुग्ण - ३९१ बरे झालेले एकूण रुग्ण - ७११२३११ बरे झालेल्या रुग्णांचा दर - ९७% एकूण सक्रिय रुग्ण- ४७४४ दुप्पटीचा दर- १५०० दिवस कोविड वाढीचा दर (२६ जुलै ते ०१ ऑगस्ट)- ०.०५% क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3lj5Uh4
No comments:
Post a Comment