Breaking

Thursday, August 26, 2021

तिसऱ्या सामन्यात या खेळाडूला खेळवून विराट कोहलीने केली मोठी चुक, भारताला बसला मोठा फटका... https://ift.tt/3gAkkX1

हेडिंग्ले : तिसऱ्या कसोटीत भारताचा कर्णधार विराट कोहलीचा नाणेफेक जिंकल्यानंतरचा निर्णय चुकला असं नाही, तर या सामन्यात एका खेळाडूला खेळवत त्याने मोठी चुक केली आहे. या सामन्यापूर्वी बऱ्याच जणांनी या खेळाडूवर टीका केली होती. पण विराटने कोणाचेही ऐकले नाही आणि त्यामुळे ही चुक आता संघाला चांगलीच महागात पडली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवल्यावर कोहलीने संघ न बदलण्याचा निर्णय घेतला. पण खेळपट्टी पाहिल्यावरही विराटने आपला निर्णय कायम ठेवला, याचा सर्वांनाच धक्का बसला. कारण खेळपट्टीवर गवत नव्हते, त्यामुळे चार वेगवान खेळण्यात कोणताच पॉइंट नव्हता. पण विराटने चार गोलंदाज खेळवले आणि इशांत शर्मा दुसऱ्या दिवशी चांगलाच महागात पडल्याचे पाहायला मिळाले. कारण इशांतने २२ षटकांत ४.१८च्या सरासरीने ९२ धावा दिल्या, याचाच अर्थ इंग्लंडच्या फलंदाजांनी त्याची चांगलीच धुलाई केली. दुसऱ्या सामन्यापूर्वी वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर हा दुखापतग्रस्त झाला होता आणि त्याच्याजागी इशांतला संधी देण्यात आली होती. पण इशांतला दुसऱ्या कसोटीत चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे शार्दुल फिट झाल्यावर त्याला संघात घ्यायला हवे होते. कारण शार्दुल हा फक्त वेगवान गोलंदाज नाही तर तो चांगली फलंदाजीही करू शकतो. पण विराटने ही गोष्ट केली नाही. जर शार्दुलला खेळवायचे नव्हते तर इशांतच्या जागी आर. अश्विन हा भारतासाठी सर्वात चांगला पर्याय होता. कारण अश्विन कोणत्याही खेळपट्टीवर विकेट्स मिळवू शकतो. त्याचबरोबर तो चांगली फलंदाजीही करू शकतो. पण विराटने यावेळी संघात कोणताही बदल केला नाही आणि त्याचा फटका भारतीय संघाला बसल्यचे आज पाहाला मिळाले आहे. इशांतकडे सर्वात जास्त अनुभव असला तरी तो सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्मात नाही. त्याचबरोबर शार्दुल हा पहिल्या कसोटीत चांगल्या फॉर्मात होता, त्यामुळे तिसऱ्या कसोटीत त्याला संधी द्यायला हवी होती. त्याचबरोबर अश्विनला भारतीय संघातून का वगळले, याचे उत्तर अजूनही मिळालेले नाही.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3mF3QAy

No comments:

Post a Comment