Breaking

Thursday, August 26, 2021

होऊ दे खर्च; २०३२ ऑलिम्पिकपर्यंत यूपी सरकार कुस्तीवर करणार १७० कोटींचा खर्च https://ift.tt/3mCOTPl

लखनऊ : उत्तर प्रदेश सरकारने कुस्ती खेळाला मदतीचा हात देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. २०३२ च्या ऑलिम्पिकपर्यंत यूपी सरकार कुस्ती महासंघाला मदत करणार आहे. जसं ओडिशा सरकार हॉकीसाठी मदत करत आहे, तशाच प्रकारे यूपी सरकार कुस्तीसाठी प्रयत्न करणार आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिज भूषण शरण सिंह म्हणाले की, कुस्ती खेळासाठी उत्तर प्रदेश सरकार २०३२ ऑलिम्पिकपर्यंत १७० कोटी रुपयांची गुंतवणूक करेल, अशी अपेक्षा आहे. कुस्ती महासंघाच्या उच्च पदाधिकाऱ्याने सांगितले की, ओडिशा सरकारच्या हॉकी खेळाला ज्या प्रकारे पाठिंबा देत आहे, त्यापासून प्रेरणा घेत उत्तर प्रदेश सरकारने कुस्ती खेळासाठी अशाच प्रकारे मदत करण्याची विनंती केली आहे. सिंह म्हणाले की, “ओडिशा हे एक लहान राज्य आहे, तरीही ते हॉकीला इतक्या उत्तम प्रकारे समर्थन देत आहे, म्हणून आम्ही विचार केला की, उत्तर प्रदेश इतके मोठे राज्य असताना कुस्तीचे समर्थन का करू शकत नाही? आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्याचा लगेच स्वीकार केला. आमच्या प्रस्तावातून आम्ही २०२४ गेम्सपर्यंत दरवर्षी १० कोटी रुपये (म्हणजे ३० कोटी रुपये) आणि नंतर २०२८ च्या पुढील ऑलिम्पिक सायकलसाठी दरवर्षी १५ कोटी रुपये (एकूण ६० कोटी रुपये) मागितले आहेत. आणि शेवटच्या टप्प्यात २०३२च्या ऑलिम्पिकसाठी दरवर्षी २० कोटी (एकूण ८० कोटी रुपये) मागितले आहेत. देशातील अव्वल कुस्तीपटूंपुरतेच ही योजना मर्यादित राहणार नाही. कॅडेट स्तरावरील कुस्तीपटूंनाही प्रायोजित केले जाईल आणि आम्ही राष्ट्रीय चॅम्पियन्सनादेखील बक्षीस रक्कमही देऊ शकू, हा यामागचा हेतू आहे. टाटा मोटर्सचा आधीपासूनच पाठिंबा कुस्ती महासंघाने २०१८ मध्ये भारतीय कुस्तीचे मुख्य प्रायोजक म्हणून टाटा मोटर्ससोबत भागीदारी केली होती, ज्याद्वारे त्यांना १२ कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळाली. त्यामुळे महासंघ टोकियो ऑलिम्पिकपर्यंत कुस्तीपटूंना केंद्रीय करार देऊ शकला. शुक्रवारी पुन्हा एकदा नवीन करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या मदतीमुळे भारतीय कॅडेट स्तराचे कुस्तीगीर आता परदेशात प्रशिक्षण दौरेही करू शकतील. JSW आणि OGQ चे करार संपुष्टात येणार? उत्तर प्रदेश राज्य सरकारसोबतच्या या नव्या करारानंतर कुस्ती महासंघ जेएसडब्ल्यू (JSW) आणि ओजीक्यू (OGQ) सारख्या खासगी स्वयंसेवी संस्थांना कुस्तीला पाठिंबा देण्याची परवानगी देईल का, हे पाहणे बाकी आहे. याबाबत विचारले असता सिंग म्हणाले की, सर्व दरवाजे खुले आहेत, पण त्यासाठी एक अट आहे. "आम्हाला यापूर्वीही त्यांची गरज नव्हती, पण जर त्यांना सहकार्य करायचं असेल, तर त्यांचं स्वागत आहे. या कंपन्यांनी कुस्ती महासंघासोबत पारदर्शकता ठेवावी, अशी आमची इच्छा आहे. या कंपन्या कुस्तीपटूंशी गुप्त करार करू शकत नाहीत, जर त्यांना मदत करायची असेलं तर त्यांनी आमच्याबरोबर बसून योजना कराव्यात, असेही सिंह यांनी स्पष्ट केलं.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/38dnBqF

No comments:

Post a Comment