Breaking

Sunday, August 1, 2021

नियमांच्या चौकटीत उत्सवाचे आयोजन; 'लालबागचा राजा'सह अनेक मंडळांचा निर्णय https://ift.tt/3j9uvlL

म. टा. विशेष प्रतिनिधी, उत्सव मंडळाने यंदा करोनानियमांचे पालन करीत उत्सव साजरा करण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या बैठकीनंतर जाहीर केला. त्यानंतर गेल्यावर्षी करोनाच्या प्रादुर्भावामुळे उत्सव रद्द करणाऱ्या इतर अनेक मंडळांनीही यंदा चोख नियोजनाद्वारे उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईच्या गणेशोत्सवाची ओळख असलेल्या लालबागचा राजा उत्सव मंडळ यावर्षी कोणता निर्णय घेणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. यंदा उत्सवात खंड पडू न देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. देशभरातील भाविकांना यंदा ऑनलाइन पद्धतीने लालबागच्या राजाचे दर्शन घेता येणार आहे. त्यासाठीच्या नियोजनालाही मंडळाने सुरुवात केली आहे. मुंबईत १२ हजार सार्वजनिक मंडळे आहेत. त्यापैकी अनेक मोठ्या मंडळांनी गेल्यावर्षी उत्सव रद्द केला होता किंवा दीड दिवसांमध्ये बाप्पाचे विसर्जन केले होते. पण यंदा बहुतांश सर्वच मंडळांमध्ये ११ दिवस उत्सवाची धामधूम पाहायला मिळणार हे आता स्पष्ट झाले आहे. सध्या करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे करोनानियमांचे पालन करीत उत्सव साजरा करण्याचा निर्णय मंडळे घेत आहेत ही आनंदाची बाब आहे. मुख्यमंत्री आम्हाला बैठकीसाठी वेळ देतील अशी अपेक्षा आहे. उत्सवाला अजून महिना आहे. त्यामुळे अधिक चांगल्या वातावरणात हा उत्सव कसा साजरा होईल. याविषयीची दिशा ठरवण्यासाठी ही चर्चा होणे आवश्यक असल्याचे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर यांनी सांगितले. समितीने आपल्या मागण्यांचे एक पत्र पुन्हा मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवले आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने होणारे अर्थकरणही खूप मोठे आहे. पण मूर्तिकारांच्या प्रश्नापासून ते या उत्सवाशी निगडीत इतर अनेकांचे व्यवसाय संकटात आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रश्नी लक्ष घालून ते सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी मंडळांकडून करण्यात येत आहे. नियमांसाठी वेगळी समिती येत्या काळात करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गणेशोत्सवात भाविक मोठ्याप्रमाणात घराबाहेर पडत असल्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्यादृष्टीने मंडळांनी नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. लसीकरण झालेल्या कार्यकर्त्यांना उत्सवाच्या तयारीत सहभागी करून घेण्यापासून ते करोना सुरक्षिततेचे नियम मंडपामध्ये नीट पाळण्यासाठी वेगळी समिती तयार करण्यावर अनेक मंडळे भर देताना दिसत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3rOU53a

No comments:

Post a Comment