Breaking

Friday, August 27, 2021

शिवसेनेनंतर आता भाजपचाही शुद्धीकरण विधी; पाहा, नेमकं काय घडलं? https://ift.tt/3jqoaDX

जळगाव: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर जळगावात शिवसेनेने भाजप कार्यालयाला लक्ष्य करत तोडफोड करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी शिवसैनिकांनी कोंबड्या फेकत आंदोलन केले होते. यानंतर शुक्रवारी भाजपच्या वतीने बळीराम पेठ येथील वसंतस्मृती कार्यालयात होमहवन करत कार्यालयाचे शुद्धीकरण करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या कृतीचा निषेधही करण्यात आला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रा सुरू करण्यापूर्वी मुंबईतील शिवाजी पार्क इथं असलेल्या शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेतलं होतं. त्याचा निषेध म्हणून राणे परतल्यानंतर शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडून स्मृतिस्थळाचं शुद्धीकरण केलं होतं. त्यानंतर जळगावात भाजपनंही त्याच स्टाइलनं शिवसेनेला उत्तर दिलं आहे. वाचा: कार्यालयात मंत्रोच्चारांसह होमहवन करण्यात आले. तसेच संपूर्ण कार्यालयात पाणी शिंपडण्यात आले. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेने हिंदू धर्मीयांचा पवित्र समजल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यात भाजप कार्यालयात कोंबड्या फेकण्याचा कृतीचाही निषेध व्यक्त करण्यात आला. भाजपा महिला मोर्चा व अध्यात्मिक आघाडीतर्फे वसंतस्मृती कार्यालयाचे शुद्धीकरण कार्यक्रम करण्यात आला. यावेळी महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी , भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष उज्वला बेंडाळे, यांच्या नेतृत्वात अध्यक्षा दिप्ती चिरमाडे, महिला सरचिटणीस रेखा वर्मा, सरोज पाठक, जिल्हा पदाधिकारी रेखा कुलकर्णी, महिला आघाडीच्या पूजा चौधरी, तृप्ती पाटील, सरचिटणीस उदय परदेशी ,सरस्वती मोरे, शर्वरी मोरे, ज्योती बर्गे यांच्यासह नगरसेवक विशाल त्रिपाठी, महेश जोशी, नितीन इंगळे, विधानसभा क्षेत्र दिपक साखरे, ओबीसी आघाडी अध्यक्ष जयेश भावसार, युवा मोर्चाचे अध्यक्ष आनंद चौधरी व कार्यालय मंत्री यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3mCAumj

No comments:

Post a Comment