म. टा. विशेष प्रतिनिधी, गणेशोत्सव काळात मुंबईतून चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणातील गावी जात असतात. मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे रस्त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरुस्तीचे काम तातडीने करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री यांच्याकडे केली होती. गडकरी यांनी या मागणीला प्रतिसाद देत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील रस्ते दुरुस्तीसाठी १०० कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे. तटकरे यांनी राजधानी दिल्लीमध्ये गडकरी यांची भेट घेत महापुरामुळे झालेल्या नुकसानाकडे त्यांचे लक्ष वेधले होते. त्यावर गडकरी यांनी हा निधी जाहीर केला आहे. राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अभूतपूर्व पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातील ५२ कोटी रुपये हे तात्पुरत्या आणि तातडीच्या दुरुस्तीसाठी, तर ४८ कोटी रुपये हे कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी दिल्याची माहिती गडकरी यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. त्याचबरोबर मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणजवळचा वशिष्ठी नदीवरचा पूल देखील पावसामुळे खराब झाला होता. त्याची दुरुस्ती लगेच करून ७२ तासांत तो पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याची माहितीही गडकरी यांनी दिली आहे. एवढेच नाही तर परशुराम घाट, कारूळ घाट, आंबा घाट इथे रस्त्यात आलेले अडथळेही दूर करण्यात आले आहेत. तात्पुरत्या दुरुस्तीची कामे आधीच हाती घेण्यात आली असून कायमची दुरुस्ती करण्याचेही काम प्राधान्याने केले जाईल, असे आश्वासनही गडकरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2VBGAYD
No comments:
Post a Comment