Breaking

Friday, August 6, 2021

करोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी; जम्बो करोना केंद्र सज्ज https://ift.tt/3lFN8R2

म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईत करोनाची साथ नियंत्रणात येत असल्याने राज्य सरकार आणि पालिकेने काही निर्बंध शिथील केले आहेत. मात्र, करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेत पालिकेने पूर्वतयारी हाती घेतली आहे. त्यासाठी, नवीन करोना केंद्रांसह सध्या तात्पुरती बंद केलेली करोना केंद्रे १२ ऑगस्टपासून टप्प्याटप्प्याने सुरू केली जाणार आहेत. करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेस रोखण्यात पालिकेने यश मिळवल्याने त्या अनुभवाच्या आधारे, तिसरी लाट आल्यास ती रोखण्यासाठी सर्वच जम्बो करोना केंद्रे नव्या क्षमतेने सुरू केली जात आहेत. करोना रुग्णांवरील उपचारांमध्ये कोणतीही कमतरता राहू नये याकडेही लक्ष दिले जाणार आहे. त्याचा भाग म्हणून सध्या सुरू असलेल्या जम्बो केंद्रांसह नवीन आणि तात्पुरती बंद असलेली एकूण १० जम्बो करोना केंद्रे सुरू केली जातील. मुंबईत पहिल्या लाटेवर मात केल्यानंतर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये करोना नियंत्रणात आला होता. मात्र, त्यानंतर, फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत करोनाची दुसरी लाट आणि रुग्णसंख्या दररोज १० ते ११ हजारांपर्यंत गेली होती. त्यावरही पालिकेस योग्य पद्धतीने नियंत्रण मिळविता आले. त्यामुळे रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत जातानाच जूनमध्ये आलेल्या तौक्ते चक्रीवादळामध्ये सुरक्षितेतच्या दृष्टीने वांद्रे-बीकेसी, दहिसर, मुलुंड, भायखळा येथील जम्बो करोना केंद्रे बंद ठेवण्यात आली. या कालावधीत त्या केंद्रात दुरुस्ती कामे पूर्ण करून केंद्रे सुसज्ज केली आहेत. त्यापाठोपाठ, १२ ऑगस्टपासून सर्व जम्बो करोना केंद्रे टप्प्याटप्प्प्याने सुरू केली जातील, असे अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी गुरुवारी सांगितले. आयसीयू, मुलांसाठी विशेष विभाग पालिकेकडून जम्बो करोना केंद्रात ७० टक्के ऑक्सिजन खाटा आणि १० टक्के आयसीयू असतील. तसेच मुलांसाठी विशेष विभाग ठेवण्यात येत असून, तिथे पालकांनाही थांबण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. २० हजार खाटा मालाड, सायन चुनाभट्टी सोमय्या वैद्यकीय केंद्र, कांजुरमार्ग येथे पालिकेकडून ठिकाणी प्रत्येकी दोन हजार खाटांची क्षमता असेलेल्या जम्बो करोना केंद्रांचा समावेश आहे. सध्या बीकेसी, वरळी, गोरेगाव-नेस्को जम्बो करोना केंद्रांचा विस्तार करण्याची योजना आहे. या सर्व केंद्रात आवश्यकतेनुसार प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे सहा हजार अधिक खाटा पुरविल्या जाणार आहेत. त्याआधारे, करोना केंद्रांतील खाटांची संख्या २० हजारांपर्यंत पोहोचली आहे. जम्बो करोना केंद्रे वांद्रे बीकेसी, गोरेगाव नेस्को, दहिसर, वरळी एनएससीआई, कांजूरमार्ग, मुलुंड, भायखळा रिचर्डसन क्रुडास, महालक्ष्मी रेसकोर्स, मालाड, सेव्हन हिल रुग्णालय, अंधेरी


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3fF1m0I

No comments:

Post a Comment