: मुलानेच जन्मदात्या आईवर अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. नात्याला काळीमा फासणारी ही घटना यवतमाळ तालुक्यातील ब्राह्मणी परिसरात घडली. या प्रकरणी २७ वर्षीय नराधम आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी मुलगा हा आईसह ब्राह्मणी परिसरात राहतो. त्याचे लग्न झालेलं नाही. तो नजिकच्याच एका कोल व्हॉशरीमध्ये काम करतो. त्याला दारूचे व्यसन असल्याची माहिती आहे. शुक्रवारी दिनांक २३ जुलै रोजी तो कामावरून घरी आला आणि झोपी गेला. दरम्यान घरी त्याची आई एकटीच झोपली होती. मध्यरात्री मुलाच्या मनात विकृती जागी झाली. त्याने आईसोबत बळजबरी करीत अत्याचार केला. पीडित आईने शुक्रवारी दिनांक ३० जुलै रोजी पोलिस स्टेशन गाठत ठाणेदारांना याबाबत माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नराधम मुलावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असून त्याच्यावर भादंविच्या कलम३ ७६ (२) (एफ) (ए) ३२३, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास पीएसआय अरुण नाकतोडे करत आहे. अस्वस्थ आईने केले विष प्राषण मुलाकडून असं विकृत कृत्य झाल्याचे आईला सहन झाले नाही. घटनेच्या काही वेळेनंतर तिने विष प्राषण करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सकाळी आईला वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर ती बरी झाली. मात्र मुलाने केलेलं विकृत कृत्य काही तिच्या डोक्यातून जात नव्हते. अखेर तिने पोलिसांत तक्रार देण्याचा निश्चय केला आणि मुलाविरोधात तक्रार दाखल केली दरम्यान, याप्रकरणातील आरोपी मुलावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3yhTZDX
No comments:
Post a Comment