Breaking

Thursday, August 26, 2021

मुंबईत धोक्याची घंटा; रुग्णसंख्येनं घेतली पुन्हा उसळी https://ift.tt/3mCMN2c

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः मुंबईत करोनारुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिलासादायी चित्र दिसू लागल्यानंतर निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र मागील काही दिवसांपासून शहरात रुग्णसंख्येने पुन्हा उसळी घेण्यास सुरुवात केली आहे. आग्रीपाडा येथील अनाथाश्रमात २२ आणि कांदिवलीच्या एका सोसायटीत सहा रुग्ण आढळल्याने, ही धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे. अनाथाश्रमात २२ जणांना लागण आग्रीपाडा येथील सेंट जोसेफ अनाथाश्रमातील आरोग्य शिबिरात मुले आणि कर्मचारी मिळून तब्बल २२ जणांना लागण झाल्याचे समोर आले आहे. यात १२ वर्षांखालील चार, १२ ते १८ वर्षांपर्यंतची १२ मुले आणि सहा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यातील चार मुलांना नायर रुग्णालयातील मुलांसाठीच्या विभागात, तर उर्वरित १८ जणांना भायखळ्यातील रिचर्डसन क्रुडास करोना केंद्रात दाखल करण्यात आले आहे. शहरात मागील काही दिवसांपासून करोनारुग्ण सातत्याने कमी होत होते. त्याअनुषंगाने राज्य सरकार, पालिकेने अनेक निर्बंध शिथीलही केले आहेत. या परिस्थितीत आग्रीपाड्यातील सेंट जोसेफ शाळा आणि अनाथाश्रमातील दोन मुले काही दिवसांपूर्वी करोनाग्रस्त झाल्याचे आढळले. पालिकेच्या ई विभागाने तातडीने सतर्कता दाखवत दोन दिवसांपूर्वी येथील मुले व कर्मचारी अशी ९५ जाणांची करोनाचाचणी केली. यात एकूण २२ जणांना बाधा झाल्याचे आढळून आले. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. कांदिवली आणि आग्रीपाडा येथे एकाचवेळी मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्याने चिंता व्यक्त होत आहे. रुग्णसंख्या कमी झाली असताना व निर्बंध शिथील झाले असताना अशापद्धतीने पुन्हा रुग्ण आढळल्याने मुंबईकरांनी सावध व्हायला हवे, असे मत पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3znTp8b

No comments:

Post a Comment