Breaking

Monday, August 30, 2021

भारतीय संघाला चौथ्या सामन्यात मिळू शकते गूड न्यूज, इंग्लंडचा मॅचविनर खेळाडू होऊ शकतो संघाबाहेर... https://ift.tt/3sZAn5o

लंडन : तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा धक्का बसला आहे. पण आता भारतीय संघाला चौथ्या सामन्यात एक आनंदाची बातमी मिळू शकते. कारण इंग्लंडचा एक महत्वाचा खेळाडू चौथ्या कसोटी संघाबाहेर होऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत. आतापर्यंत भारतीय संघासाठी इंग्लंडचे दोन खेळाडू सर्वाधिक डोकेदुखी ठरलेले आहे. यातील पहिला खेळाडू म्हणजे इंग्लंडचा कर्णधार जो रुट. कारण तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये रुटने शतक झळकावले आहे. इंग्लंडसाठी दुसरा सर्वात महत्वाचा खेळाडू आहे तो म्हणजे अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन. कारण तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये अँडरसनने सातत्याने विकेट्स मिळवलेल्या आहेत. चौथ्या कसोटी सामन्यासाठी अँडरसन हा संघाबाहेर होऊ शकतो, असे संकेत आता मिळत आहेत. अँडरसन हा सातत्याने कसोटी क्रिकेट खेळत असून त्याच्यावरचा कामगिरीचा ताण वाढत आहे. त्यामुळे चौथ्या कसोटीसाठी त्याला विश्रांती देण्याचा विचार इंग्लंडचा संघ करत आहे. कारण अँडरसन हा इंग्लंडसाठी फिट असणे सर्वात महत्वाचे आहे. कारण तो जर अनफिट झाला तर इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीला मोठा धक्का बसू शकतो. त्यामुळे कामगिरीचा ताण घेऊन अँडरसनला दुखापत होऊ नये, याचा विचार इंग्लंडचा संघ करत आहे. त्यामुळे अँडरसनला चौथ्या सामन्यात विश्रांती देण्यात येऊ शकते, जेणेकरून तो पाचव्या आणि अखेरच्या कसोटीसाठी पूर्णपणे फिट राहू शकतो. त्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यात जर त्याला खेळवले नाही तर त्याच्याजागी मार्क वुडला संघात स्थान देण्यात येऊ शकते. वुड, ख्रिस वोक्स, ऑली रॉबिन्सन हे तीन इंग्लंडचे गोलंदाज चौथ्या कसोटीत खेळू शकतात. त्यामुळे अँडरसनला चौथ्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. चौथा सामना जिंकून मालिकेत आघाडी मिळवण्यासाठी इंग्लंडच्या संघाने हे महत्वाचे पाऊ उचलले आहे. इंग्लंडच्या संघात ख्रिस वोक्स या धडाकेबाज खेळाडूचा प्रवेश झाला आहे. वोक्सकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. त्याचबरोबर वोक्स हा वेगवान गोलंदाजीबरोबर उपयुक्त फलंदाजीही करू शकतो. जोस बटलर हा चौथा सामना खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण बटलरची पत्नी गर्भवती आहे आणि लवकर त्यांच्या घरात पाळणार हलणार आहे. त्यामुळे बटलरने चौथ्या कसोटीत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. बटलरच्या जागी सॅम बिलिंग्सला इंग्लंडच्या संघात स्थान देण्यात आले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3BuJ0It

No comments:

Post a Comment