पलवल, हरयाणाः प्रेम अंधळं असतं असं म्हणतात. पण हरयाणातील एका प्रेम विवाहाने सर्व चकीत झाले आहेत. एका १९ वर्षांच्या तरुणीचं ६७ वर्षांच्या ज्येष्ठावर प्रेम जडलं. दोघांनी लग्न केलं. पण या प्रेमी युगुलाला आपल्या कुटुंबांपासून धोका असल्याचं वाटतंय. यामुळे त्यांनी सुरक्षेसाठी थेट हायकोर्टात धाव घेतली आहे. ६७ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाला ७ मुलं आहेत. सर्व मुलांची लग्न झाली आहेत. त्यांच्या नव्या नवरीचेही आधी लग्न झाले आहे. मुलीच्या कुटुंबीयांकडून जीवाला धोका असल्याने आपल्याला पोलिसांची सुरक्षा द्यावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकाने केली आहे. ज्येष्ठ नागरिकांचं म्हणणं ऐकून कोर्टाही चकीच झालं. पण कोर्टाने हरयाणा पोलिसांना आदेश देत दोघांना सुरक्षा पुरवण्यास सांगितलं आहे. दोघांचं लग्न कुठल्या स्थितीत झालं याचा तपास पोलिसांनी करावा, असे आदेशही कोर्टाने दिले. पोलिसांची एक टीम नेमावी. यात महिला पोलिसांचाही समावेश करावा. ही टीम मुलीला सुरक्षा देईल. पुरुषाचं हे कुठलं लग्न आहे? या प्रकरणी टीमने सखोल चौकशी करावी. पुरुषाची भूतकाळाचाही तपास करवा. एका आठवड्याच्या आत तपास करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले. ६७ वर्षांचे ज्येष्ठ आणि मुलगी या दोघांची आधीही लग्न झाली आहेत. ज्येष्ठाला ७ मुलं आहेत आणि त्या सर्वांची लग्नं झाली आहेत. त्याच्या पत्नीचे ४ वर्षांपूर्वी निधन झाले आहे. तर ज्येष्ठाशी लग्न करणाऱ्या मुलीचं आधी एक लग्न झालं आहे. तिला मूल नाहीए, असं पोलिस उपअधीक्षक रतनदीप बाली यांनी सांगितलं. मुलीच्या कुटुंबीयांचा गावात जमिनीवरून वाद होता. प्रेम विवाह करणारी ज्येष्ठ व्यक्ती त्यांच्या घरी मदतीसाठी जात होते. यावेळी दोन्ही संपर्कात आले, अशी माहिती पोलिस उपअधीक्षकांनी दिली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3rRWIl5
No comments:
Post a Comment