मुंबई: माजी गृहमंत्री यांच्यावर आरोप असलेल्या वसुली प्रकरणात आता परिवहन मंत्री यांना ईडीने नोटीस बजावल्याने महाविकास आघाडीतून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री यांनी थेट शब्दांत निशाणा साधला आहे. सरकारच्या नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी ईडीचा वापर होतो आहे, असे जयंत पाटील म्हणाले. ( ) वाचा : निव्वळ महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनाच नव्हे तर देशातील भाजप विरोधी भूमिका घेणाऱ्यांना त्रास देणे व त्यांच्या त्रुटी असतील तर त्या हुडकून काढण्याचा प्रयत्न यंत्रणा करताना दिसत आहेत. ज्यांना नोटिसा आल्या आहेत ते नेते सडेतोड उत्तर देतील पण यामागे राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. अनिल देशमुख यांच्याबाबतीत एक नंबर कोण हे सचिन वाझे व इतरांच्या जबाबात सिद्ध झाले आहे. अनिल देशमुख यांचा या केसमध्ये संबंध नाही हे पुन्हा उघड झाले आहे. शिवाय परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणून स्टेटमेंट घेतले जातेय हे चुकीचे काम सुरू आहे, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला. वाचा: नेमकं काय आहे प्रकरण? राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी सचिन वाझे याला दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. या प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या निर्देशांवरून सीबीआय आणि नंतर या केंद्रीय तपास यंत्रणा तपास करत आहेत. ही चौकशी सुरू असतानाच देशमुख यांना सीबीआयने क्लीनचिट दिल्याच्या बातम्या रविवारी पसरल्या. सीबीआयचा फाइल बंद करण्याबाबतचा अंतर्गत गोपनीय अहवाल लीक झाल्याचेही बोलले जात होते. मात्र सीबीआयने त्यावर तातडीने स्पष्टीकरण देत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे आणि त्याची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. यावरून मोठं वादळ उठलं असतानाच सायंकाळी परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीकडून याच प्रकरणात नोटीस बजावण्यात आली. परब यांना उद्या (मंगळवार) सकाळी ११ वाजता मुंबई येथील ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. या दोन्ही घडामोडींनंतर महाविकास आघाडीतून आक्रमक प्रतिक्रिया येत आहेत. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2WB8TXM
No comments:
Post a Comment