नागपूर: अत्याचाराच्या प्रकरणातील एफआयआरमध्ये सगळी माहिती देण्यात आली नव्हती. न्यायालयात साक्ष नोंदविताना पीडितेने अधिकची माहिती दिली, ही माहिती ग्राह्य धरली जाऊ नये व आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात यावी, असा मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने फेटाळून लावला व म्हणजे काही एनसायक्लोपिडिया नाही, असे मत नोंदवत आरोपीला जिल्हा न्यायालयाने सुनावलेली २० वर्षे कारावासाची शिक्षा कायम ठेवली. ( ) वाचा: पतीच्या गळ्याला चाकू लावून त्याच्यादेखत त्याच्या पत्नीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाची २० वर्षे कारावासाची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे. (२४) असे या आरोपीचे नाव आहे. ही घटना २८ फेब्रुवारी २०१६ रोजी जिल्ह्यात घडली होती. वाचा: पीडित महिला ही एका शेतात तिच्या पतीसोबत काम करीत होती. यावेळी आरोपी आणि त्याचा अन्य एक सहकारी तेथे पोहोचले. या दोघांनी पीडित महिलेच्या पतीला चाकुचा धाक दाखविला. त्याच्या गळ्याला चाकू लावून आरोपींनी पीडित महिलेवर अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. अन्य आरोपी आजही फरार आहे. तपासाअंती आरोपीवर आरोपपत्र दाखल करण्यात आले. जिल्हा न्यायालयाने त्याला २० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली होती. दोषी शंकरने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र, उच्च न्यायालयानेसुद्धा त्याचा युक्तिवाद फेटाळून लावत ही शिक्षा कायम ठेवली. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3h6XqXx
No comments:
Post a Comment