Breaking

Monday, September 6, 2021

रोहित शर्माने फक्त एका गोष्टींने जिंकली सर्वांची मनं, पाहा सामन्यानंतर नेमकं काय केलं... https://ift.tt/3DPowMp

लंडन : रोहित शर्माने धडाकेबाज शतक झळकावत बरेच विक्रण मोडीत काढले आणि विजयात सिंहाचा वाटाही उचलला. त्यामुळेच रोहिताल यावेळी सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. पण सामनावीराचा पुरस्कार पटकावल्यावर रोहितने अशी एक गोष्ट केली की, सर्वांची मनं त्याने आपल्या एका गोष्टीतूनच जिंकली. रोहित शर्माने नेमकं केलं तरी काय, पाहा...रोहितने या कसोटीच्या दुसऱ्या डावात १२७ धावा केल्या आणि त्यामुळेच भारताला मोठी धावसंख्या उभारता आली. त्यामुळेच रोहितला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. सामनावीराचा पुरस्कार स्विकारल्यावर रोहितने जे काही बोलला, त्यामुळे त्याने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. सामनावीर पुरस्कार स्विकारल्यावर रोहित म्हणाला की, " माझ्यापेक्षा जास्त सामनावीराच्या पुरस्कारासाठी शार्दुल ठाकूर हा लायक आहे, असे मला वाटते. माझ्यासाठी हे शतक नक्कीच खास आहे. कारण या शतकामुळे भारताला विजय मिळाला आहे. भारतीय संघाला सुस्थितीत मी आणू शकलो, याचा मला सर्वात जास्त आनंद आहे. मैदानात खेळत असताना मी जास्त काळ खेळपट्टीवर कसा राहीन, याचा विचार मी करत होतो. त्यावेळी शतक पूर्ण करण्याचा विचार माझ्या मनातही नव्हता. पण खास रणनीती आखून मैदानात खेळत राहिलो आणि शतक पूर्ण झाले. माझे हे शतक भारताच्या विजयासाठी कामी आले, या गोष्टीचा मला सर्वात जास्त आनंद आहे. त्यामुळे हे शतक कायम माझ्या स्मरणात राहील." शार्दुलने या सामन्यात नेमकं केलं तरी काय, पाहा... शार्दुल हा फक्त वेगवान गोलंदाज आहे, असे सर्वांना वाटत होते. पण या सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये शार्दुलने अर्धशतकं झळकावली आणि संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. जिथे भारताने फलंदाज अपयशी ठरत होते, तिथे शार्दुलने दोन्ही डावांत संघाला गरज असताना धडाकेबाज खेळी साकारल्या आणि दोन्ही डावांत अर्धशतकं झळकावणारा तो भारताचा एकमेव तळाचा फलंदाज ठरला. शार्दुलने यावेळी भारताच्या मार्गात अडरस बनू शकणाऱ्या जो रुटला दुसऱ्या डावात लवकर बाद केले आणि त्यानंतरच भारतीय संघाला विजयाची आशा निर्माण झाली. शार्दुलने भेदक गोलंदाजीही करत विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्यामुळे भारतासाठी यावेळी सर्वात उपयुक्त खेळाडू हा शार्दुल ठरल्याचे पाहायला मिळाले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3h8j79A

No comments:

Post a Comment