मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांनी गेल्या काही दिवसांपासून पुणे शहराकडे विशेष लक्ष दिले असून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या बळकटीवर त्यांनी भर दिला आहे. त्यांच्या या रणनीतीला मात देण्यासाठी शिवसेनेने शुक्रवारी शिवसेना उपनेते सचिन अहिर यांची पुणे संपर्क प्रमुखपदावर नेमणूक केली. विशेष म्हणजे मनसेमधून शिवसेनेत आलेल्या यांची पुणे सहसंपर्कपदी नेमणूक केली आहे. अहिर यांनी जुलै २०१९मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. सेना प्रवेशापूर्वी अहिर यांचा राष्ट्रवादीत मोठा दबदबा होता. १९९९ मध्ये सचिन अहिर पहिल्यांदा आमदार बनले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात २००९ मध्ये ते गृहनिर्माण राज्यमंत्री होते. आदित्य शिरोडकर यांनी मनसेमध्ये असताना शिक्षण विभागाशी संबंधित काम करत तरुणांचे नेतृत्व केले. या दोघांच्या अनुभवांचा पुण्यात उपयोग करून घ्यायचा असे शिवसेनेने ठरविल्याचे दिसते. मुंबईबरोबरच पुण्यातही मनसेनं शिवसेनेची मतं आपल्याकडं वळविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. पुणे महापालिकेत शिवसेनेला स्वबळावर सत्तेत येण्याची संधी नसली तरी राज्यातील सत्तेचा लाभ उठवत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्यामुळंच राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेतून आलेल्या अनुभवी शिलेदारांवर पुण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याचं समजतं. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3gZtzQs
No comments:
Post a Comment