पालघर: बोईसर येथील एका कंपनीत स्फोट होऊन नंतर भडकलेल्या आगीत एकाचा मृत्यू झाला आहे. तर, चौघे जखमी झाले आहेत. हा स्फोट नेमका कशामुळं झाला हे समजू शकलेलं नाही. (One dead, four Injured in Boisar Factory Explosion) जखारिया फॅब्रिक लिमिटेड या कंपनीत सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयंकर होता की स्फोटाचे आवाज तीन ते चार किलोमीटरपर्यंत ऐकू आले. कपड्याची कंपनी असल्यामुळं स्फोटानंतर लगेचच आग भडकली. त्यात चार कामगार जखमी झाले. तर एकाचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या पथकानं त्वरीत घटनास्थळी धाव घेतली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. एक मृतदेह हाती लागल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3tfLI1r
No comments:
Post a Comment