Breaking

Friday, September 3, 2021

इंधन दर ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा पेट्रोल - डिझेलचा भाव https://ift.tt/2YlZNit

मुंबई : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत आहे. दुसऱ्या बाजूला चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य वधारत आहे. मात्र पेट्रोलियम कंपन्यांनी तूर्त इंधन दर स्थिर ठेवले आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर आहे. आज शनिवारी सलग तिसऱ्या दिवशी इंधन दर जैसे थे ठेवले आहेत. मुंबईत आज एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.३९ रुपयांवर कायम आहे. दिल्लीत पेट्रोल १०१.३४ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ९९.०८ रुपये इतका आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०१.७२ रुपये झाला आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०९.७७ रुपयांपर्यंत खाली आला आहे. बंगळुरात पेट्रोल १०४.८४ रुपये झाले आहे. आज डिझेलचा भाव देखील जैसे थेच आहे. मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ९६.३३ रुपये आहे. दिल्लीत डिझेल ८८.७७ रुपये झाला आहे. चेन्नईत ९३.३८ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९१.८४ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९७.५७ रुपये असून बंगळुरात डिझेल ९४.१९ रुपये आहे. निर्बंध शिथिल झाल्याने इंधनाचा खप हळूहळू वाढत आहे. ऑगस्ट महिन्यात डिझेलचा खप करोना पूर्व पातळीच्या तुलनेत १० टक्के कमी आहे. तर पेट्रोलची विक्री मात्र ४ टक्क्यांनी वाढली आहे. यापूर्वी कंपन्यांनी १८ ते २० ऑगस्ट असे तीन सलग दिवस डिझेल दरात २० पैसे कपात केली होती. त्यानंतर रक्षाबंधनाच्या दिवशी डिझेल २० पैशांनी स्वस्त झाले होते. त्यानंतर एकदा डिझेलमध्ये १५ पैसे आणि गेल्या बुधवारी पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रत्येकी १५ पैसे कपात करण्यात आली होती. दरम्यान, जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण कायम आहे. शुक्रवारी ब्रेंट क्रूडचा भाव ७३.६१ डॉलर प्रती बॅरल झाला. त्यात ०.४० डॉलरची घसरण झाली. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ६९.८३ डॉलर प्रती बॅरल झाला. त्यात ०.७० डॉलरची घसरण झाली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3jHdfpf

No comments:

Post a Comment