Breaking

Friday, September 3, 2021

डोंबिवलीत दोन फेरीवाल्यांमध्ये हाणामारी; एकाने बांबूच काढला https://ift.tt/3yHPzWb

म. टा. वृत्तसेवा, कल्याण ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांवर परप्रांतीय फेरीवाल्याकडून प्राणघातक हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच, डोंबिवलीत दोन भाजी विक्रेत्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पूर्वेकडील गोळवली येथे राहणारे कमलाकर पाटील हे डोंबिवली पूर्वेकडील राजेश ज्वेलर्स दुकान परिसरातील भाजी मार्केट गल्लीमध्ये भाजी विक्री करतात. सागर्ली येथे राहणारे परशुराम मल्याली, जयेश मल्याली, सुभाष मल्याली आणि विष्णू मल्याली हे देखील पाटील दाम्पत्याच्या बाजूला भाजी विकायला बसले होते. यामुळे आपल्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचे सांगत पाटील यांच्या पत्नीने या चौघांना तेथे भाजी विक्रीस मनाई केली. त्यावेळी या चौघांनी त्यांना शिवीगाळ करत पाटील यांना बांबूने आणि ठोशाबुक्क्याने मारहाण केली. याप्रकरणी पाटील यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3DVZpb1

No comments:

Post a Comment