मुंबई: रायगड लोकसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेना नेते पराभवानंतर चर्चेत नव्हते. मात्र, आता आपण राजकारणात पुन्हा सक्रिय होणार असल्याचे स्पष्ट संकेत गीते यांनी दिले आहेत. मी सध्या खासदार नसलो तरी अद्याप राजकारणाला विराम दिलेला नाही, असे माजी केंद्रीय मंत्री शिवसेना नेते अनंत गीते यानी स्पष्ट करत विरोधकांचा समाचार घेतला आहे. यापुढे आपण राजकारणात सक्रियच राहणार असल्याचे गीते यांनी म्हटले आहे. गीते कुणबी हितवर्धिनी सेवा संघ, दापोलीच्या मुंबईतील शिवसेना भवन दादर येथे झालेल्या मेळाव्यात बोलत होते. आपण स्वतः कुणबी हितवर्धीनीचे सभासद झालो असल्याचे सांगत त्यांनी जास्तीत जास्त सभासद नोंदणी करण्याची संस्थाचालकांना सूचना व आवाहन यावेळी केले. यावेळी रायगड लोकसभा मतदासंघात झालेल्या पराभवानंतर काही दिवस शांत असलेले गीते यांनी आपण पुन्हा सक्रिय झाल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. कोकणात रत्नागिरी जिल्हयात दापोली येथे कुणबी भवन उभारणीसाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही कुणबी समाजाचे ज्येष्ठ नेते अनंत गिते यांनी दिली आहे. क्लिक करा आणि वाचा- कुणीही आडवे गेले तरी कुणबी भवन उभारणारच- आमदार योगेश कदम आमदार योगेश कदम यांनी आपली संवाद साधताना म्हटले की, रामदास कदम आणि अनंत गीते यांच्या सहकार्याने कुणबी समाजाच्या स्वाभिमानासाठी दापोलीत कुणबी भवन उभारण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असून कुणी कितीही आडवे गेले तरी आपण कुणबी भवन उभारूनच दाखवू असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला. क्लिक करा आणि वाचा- या मेळाव्यास संस्थाअध्यक्ष उन्मेश राजे, संस्था सचिव सुनिल पवार, जि. प. सदस्य अनंत करबेले, कुणबी समाजोन्नती संघाचे दापोली तालूका प्रतिनिधी आणि दापोली तालूका मुंबई शिवसेनेचे सचिव नरेश घरटकर, कुणबी समाजोन्नती संघ शाखा दापोली मुंबईचे माजी अध्यक्ष आणि दापोली तालूका कुणबी पतपेढीचे माजी अध्यक्ष रमेश काटकर, शिवसेना दापोली तालूका मुंबई संघटक चंद्रकांत शिगवण, तालूका उपसंघटक विजय ठोंबरे, माजी उपसभापती अनंत बांद्रे, उपतालूका प्रमुख गुणाजी गावणुक, शाहीर अनंतबुवा मांडवकर,शिवसेना जालगाव मुंबई विभाग प्रमुख लक्ष्मण कासेकर, बुरोंडी मुंबई विभाग संघटक प्रकाश नामोळे, दापोली तालूका कुणबी पतपेढीचे माजी संचालक जनार्दन गोवळे, खेर्डी विभाग संघटक रविंद्र बैकर, बाळाराम गोरीवले, सुकोंडी ग्रामपंचायतीचे सरपंच भरत हुमणे, लक्ष्मण हरावडे, प्रकाश रहाटवळ, केळषी विभाग संघटक रविंद्र धाडवे, सुनिल चव्हाण, दाभोळ विभाग प्रमुख किरण नाचरे, शांताराम खळे, नंदकुमार चिखले, नरेश पवार, विजय भुवड, प्रकाश आग्रे, मनिष पांढरे, सुनिल जांभळे, जयेश तुरे, संतोष पांढरे, महेंद्र शिगवण, विलास राजे, प्रकाश बटावळे, राजू गोवले, लाले, आदी उपस्थित होते. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3jHR7v5
No comments:
Post a Comment