Breaking

Thursday, September 30, 2021

५ कोटींच्या खंडणीसाठी डॉक्टरचे अपहरण करून लुटले; पोलिसांनी ४ दिवसात आवळल्या मुसक्या https://ift.tt/39V5DtC

सूर्यकांत आसबे, उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथील डॉक्टरचे खंडणीच्या उद्देशाने अपहरण करून लुटलेल्या सात आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या टोळीला सोलापूर ग्रामीण एलसीबीच्या पथकाने चार दिवसात जेरबंद करून त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यातील चार आरोपी हे पुण्यातील आहेत. विकास सुभाष बनसोडे (वय ३१, राहणार ,पानमळा वसाहत, सिंहगड रोड पुणे ), सिद्धार्थ उत्तम सोनवणे ( वय ४२, राहणार, पानमळा वसाहत सिंहगड रोड पुणे ), रोहित राजू वैराळ (वय २८, राहणार वडगाव बुद्रुक भवानीनगर पुणे, हल्ली चिंतामणी शाळेच्या शेजारी आंबेगाव बुद्रुक पुणे ), रामचंद्र बालाजी कांबळे (वय २८, राहणार, साईधाम तालुका हवेली जिल्हा पुणे ), वैभव प्रवीण कांबळे (वय २१, राहणार, जवळा खुर्द, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद ) भारत दत्तात्रय गायकवाड (वय ३१, राहणार वडाळा, तालुका उत्तर सोलापूर ) आणि मुराद हनिफ शेख (वय ३१, राहणार वडाळा, तालुका उत्तर सोलापूर )अशी आरोपींची नावे आहेत. यातील पुण्यातील चारपैकी तिघेजण सराईत गुन्हेगार आहेत. ( for Rs 5 crore ransom in 4 days) असे केले अपहरण २१ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास डॉक्टर अनिल व्यंकटेश कुलकर्णी ( वय ४७ ) हे आपल्या वडाळा येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपवरून आपल्या सोलापुरातील घराकडे वेरणा गाडीतून वडाळा मार्गे निघाले असताना ईनोव्हा गाडी अडवली. त्यानंतर डॉक्टर कुलकर्णी यांना गावठी बंदुकीचा धाक दाखवून तसेच कोयत्याने उजव्या हाताच्या दंडावर, काठी व हॉकी स्टिकने उजव्या पायावर मारहाण करून जखमी करून जिवे मारण्याची धमकी दिली. आणि त्यांना जबरदस्तीने इनोव्हा गाडीत बसून त्यांचे अपहरण करून १ कोटींची खंडणीची मागणी केली. क्लिक करा आणि वाचा- या दरम्यान आरोपींनी डॉक्टर कुलकर्णी यांना मोहोळ, पंढरपूर, टेंभुर्णी, इंदापूर, बारामती ,जेजुरी, सासवड मार्गे वारजे माळवाडी पुणे येथे नेऊन त्यांच्याकडील पेट्रोल पंपाची जमा असलेली ५ लाख ७० हजार ४२० रुपये रोख रक्कम तसेच खिशातील १८ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण पाच लाख ८८ हजार ४२० रुपयांचा ऐवज काढून घेतला आणि डॉक्टर कुलकर्णी यांना पुण्यातील वारजे माळेवाडी येथे ढकलून दिले. दरम्यान डॉक्टर अनिल कुलकर्णी यांनी दोन दिवसानंतर झालेला संपूर्ण प्रकार तालुका पोलीस स्टेशनला सांगितला. तालुका पोलीस स्टेशन कडील गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र मांजरे व त्यांचे पथकाने पुणे शहर गाठले. आणि वडगाव, सिंहगड रोड पानमळा पुणे येथून आरोपींना ताब्यात घेतले व हा गुन्हा केल्याची माहिती मिळाल्यानंतर पाच आरोपींना पुण्यातून ताब्यात घेण्यात आले. क्लिक करा आणि वाचा- असा शिजला कट त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांच्यापैकी विकास बनसोडे या आरोपीने त्यांच्या मामाचा मुलगा भारत दत्तात्रय गायकवाड हा वडाळा येथे राहावयास असून त्याला मागील दोन ते तीन महिन्यांपूर्वी मोठी असामी असलेल्या व्यक्तीस लुटण्याचे काम बघण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे मामाच्या मुलाने अर्थात भारत गायकवाड याने वडाळा गावात एक डॉक्टर असून त्यांचा पेट्रोल पंपावर दवाखाना आहे. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसे असून ते दररोज पेट्रोल पंप व दवाखान्यातील जमा झालेली रक्कम त्यांच्याकडील वेरना कारमधून सोलापूरला घेऊन जातात. त्यांचे अपहरण केले तर आपल्याला एक कोटी ते दोन कोटी रुपये नक्की देईल अशी माहिती सांगितली होती. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी आपली तपासाची चक्रे फिरवली आणि सर्व सात आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील २ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम हस्तगत केली. तसेच गुन्ह्यात वापरलेली ईनोव्हा कार व एक दुचाकी सुद्धा ताब्यात घेतली आहे. याशिवाय आरोपींकडील सात मोबाईल असा एकूण ८ लाख १३ हजार पाचशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र मांजरे, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, अक्षय दळवी आणि चालक समीर शेख यांनी ही कामगिरी बजावली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/39QrX7M

No comments:

Post a Comment