Breaking

Monday, September 27, 2021

जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस; वीज पडून महिलेसह बालिकेचा मृत्यू https://ift.tt/3AQCJqv

म. टा. प्रतिनिधी, जळगाव जळगाव जिल्ह्यात आज सोमवारी वीज पडून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका महिलेसह १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. आज जिल्ह्यात बहुसंख्य भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी दिली. त्या दरम्यान या घटना घडल्यात. (a in a in district) रावेर तालुक्यातील विवरा खुर्द येथील माजी सरपंच कविता राजेंद्र पाटील यांच्या शेतात वाघेला हे आदिवासी शेतमजूर कुटुंब झोपडीतच रहात होते. दुपारी चारला पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी नूरकी वाघेला (वय३५) ही महिला शेजारच्याच विहिरीवर गेली असता तिच्या अंगावर वीज कोसळून ती जागीच ठार झाली शेजारीच असलेल्या झोपडीत तिची भाची रोशनी (वय९), मुलगा राहुल (वय७) आणि मुलगी रवीना (वय३) यांना सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही. क्लिक करा आणि वाचा- याच शेतात दुसऱ्या बाजूला काम करणारा तिचा पती देखील सुदैवाने बचावला आहे. वीज पडलेला महिलेला तातडीने रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र तत्पूर्वीच तिचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. क्लिक करा आणि वाचा- विटनेर येथे बालिकेचा मृत्यू जळगाव तालुक्यातील विटनेर शिवारात शेतात राहणाऱ्या १३ वर्षीय मुलीच्या अंगावर वीज कोसळल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना आज सायंकाळी घडली. सोनाली राजेंद्र बारेला (वय-१३) रा. विटनेर ता. जि.जळगाव असे मयत मुलीचे नाव आहे. विटनेर शिवारातील शेतात सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास शेतात असतांना तिच्या अंगावर कोसळली त्यात तीचा जागीच मृत्यू झाला आहे. जळगाव येथील एस.यु.पाटील यांच्या शेतात राहणारा रविंद्र भिमसिंग बारेला यांच्याकडे साधारण एक ते दीड महिन्यापासून सोनाली राजेंद्र बारेला राहत होती. त्याच्या मृत्यूने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3AMY04q

No comments:

Post a Comment