कोलकाताः आगामी मध्ये होणार आहे. लोकसभा निवडणुकीला अजून जवळपास ३ वर्षे आहे. पण निवडणुकीपूर्वीच काँग्रेसने पराभव स्वीकारला आहे का? काँग्रेसला सत्तेत येण्याची अपेक्षा नाही का? काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांच्या ताज्या वक्तव्यानंतर असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्ष १२० ते १३० जागा जिंकण्याचे लक्ष्य घेऊन पुढे जात आहे, असं खुर्शीद म्हणाले. आगामी लोकसभा निवडणुकीत पक्ष १२० ते १३० जागा जिंकेल. तसंच भाजपविरोधातील आघाडीचे नेतृत्व करेल, अशी अपेक्षा असल्याचं सलमान खुर्शीद म्हणाले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जवळपास ३०० जागा जिंकल्या. यापार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीत फक्त १२०-१३० जागा जिंकण्याचं लक्ष्य काँग्रेसने ठेवलं आहे का? फक्त एवढ्या जागांवर काँग्रेस सत्तेत येईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काँग्रेस प्रादेशिक पक्षांवर विसंबून? आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस प्रादेशिक पक्षांवर विसंबून असल्याचं चित्र आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भाजपने २०१९ ची लोकसभा निवडणूक जिंकली. त्यावेळी विरोधी पक्ष विखुरलेला होता. आता विरोध पक्ष एकजूट होत असल्याने भाजप संबंधित राज्यांमध्ये प्रदेशिक पक्षांच्या पाठिमागे लागली आहे. कुठलाही नेता तर मग त्याला एक नेता म्हणून कसं समोर मांडणार? कुणी नेता असेल तर तो स्वतःहून पुढे येईल. सध्याच्या स्थितीत सर्व विरोधी पक्षांमध्ये काँग्रेस चांगल्या स्थितीत आहे. यामुळे काँग्रेस १२०-१३० जागा जिंकू शकते, असं खुर्शीद म्हणाले. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये २४० ते २५० जागांवर थेट लढत होईल. यात काँग्रेस १०० ते १२० जागा जिंकून विरोधी पक्षांच्या आघाडीचं नेतृत्व करेल, असा दावा खुर्शीद यांनी केला. तसंच ममतांना विरोधी पक्षांचा नेता म्हणून समोर आणण्याबाबत खुर्शीद यांनी थेट कुठलंही उत्तर दिलं नाही. पण प्रादेशिक पक्षांना आता आपल्या भवितव्याबाबत ठरवावं लागणार आहे. कारण भाजप त्यांच्या पाठीमागे लागला आहे. यामुळे २०१९ च्या निवडणुकीतून सर्वांनी धडा घेतला पाहिजे, असं खुर्शीद म्हणाले. काँग्रेसमध्ये नेतृत्वाचे संकट नाही आणि पक्षा याबाबत बेफिकीरही नाही. पक्षात लोकशाही आहे. मतभेद असू शकतात. ज्यांनी पत्र लिहिलं त्यांनी नेतृत्वार अविश्वास दाखवला नाही, असं सलमान खुर्शीद म्हणाले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3h8ruC2
No comments:
Post a Comment