Breaking

Wednesday, September 29, 2021

भाई युनिर्व्हसिटीचा मी कधीच विद्यार्थी नव्हतो’, भाईगिरीवरून कांदे ,भुजबळ यांच्यात जुंपली https://ift.tt/3CRK0qw

म.टा.विशेष प्रतिनिधी,नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून शिवसेना (MLA Suhas Kande) आणि पालकमंत्री छगन भुजबळांमधील (Chhagan Bhujbal) वाद आता ‘भाई’गिरीपर्यंत पोहचला आहे. आमदार कांदे यांनी अंडरवर्ल्ड कडून धमकी आल्याचा आरोप केल्यानंतर ‘मी कधीच भाई युनिर्व्हसिटीत गेलो नाही,अन या भाई युनिर्व्हसिटीचा मी कधीच विद्यार्थी नव्हतो’, जे भाई युनिर्व्हसिटीचे विद्यार्थी असतील त्यांची आपआपसात चर्चा होत असेल’ असा टोला भुजबळ यांनी कांदेना लगावला आहे. भुजबळांवर आरोप करून काहीजणांना प्रसिद्धी मिळते असे सांगत,अभय निकाळजेने केलेल्या खुलाशाकडेही भुजबळांनी अंगुलीनिर्देश करत,५० वर्षाची तपश्चर्या पुलाखालून वाहून जाते की काय, असे वाटायला लागल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. (minister criticizes ) भुजबळ आणि कांदे यांच्यात झालेल्या वादासंदर्भात नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतांना भुजबळ यांनी या वादावर प्रथमच थेट भाष्य केले आहे. भुजबळांविरोधातील खटला मागे घेण्यासाठी आपल्याला थेट छोटा राजन टोळीकडून धमक्या आल्याचा लेखी आरोप आमदार कांदेनी केला आहे. तर कांदेचे आरोप छोटा राजनचा पुतण्या अभय निकाळजे यांनी फेटाळून लावत, बुधवारी उलट कांदेनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. क्लिक करा आणि वाचा- प्रसिद्धीसाठीच काही लोकांचे उद्योग- भुजबळ त्यांसदर्भात विचारले असता भुजबळ यांनी आपल्या खास शैलीत कांदेचा समाचार घेतला आहे. भुजबळांचे नाव घेतले की, प्रसिध्दी मिळते याकरीता काही लोक असा उद्योग करत असावेत. आमदार कांदे यांनी जे आरोप माझ्यावर लावले आहेत त्याबाबत चौकशीची मागणी मी स्वत: मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. उगाचच खोटे आरोप लावून भुजबळांना बदनाम करण्याचा हा डाव असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. ज्या धमकीबाबत कांदेंनी तक्रार केली आहे तो प्रकार घोटी टोलनाक्यावर कांदे समर्थकांनी एका दांम्प्तयाच्या मारहाण प्रकरणाशी संबधित आहे याचा माझ्याशी कोणताही संबध नाही असा खुलासा भुजबळांनी केला आहे.या प्रकरणाचे सर्व रेकॉर्ड तपासावेत अशी मागणीही भुजबळांनी करत,कांदेनाच आता प्रतीआव्हान दिले आहे. क्लिक करा आणि वाचा- कोण प्राचार्य उद्या सांगतो - कांदे दरम्यान अभय निकाळजे आणि भुजबळ यांनी केलेल्या आरोपासंदर्भात बोलतांना कांदेनी भुजबळांवर पलटवार केला आहे.मी मुंबईत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली असून त्यांना पुरावे सादर केले आहेत.तसेच कोण भाई भाई युनिर्व्हसिटीचा प्राचार्य आणि कोण विद्यार्थी याचे पुरावेच मी गुरूवारी (३०) नाशिकच्या जनतेसमोर पत्रकार परिषद घेवून सांगणार आहे.धमकीबाबत मी तक्रार केली असून पोलिस त्याचा खरेखोटेपणा शोधतील. गुन्हा केला आहे,हे आरोपी कधीच मान्य करत नाही,ते तपासात समोर येईल असे सांगत,भुजबळांना त्यांच्या प्रश्नांची सगळी उत्तरे दिली जातील असे आव्हान कांदेनी दिले आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3zZdKQM

No comments:

Post a Comment