पुणे: केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांच्या पत्नी () आणि आमदार () यांच्याविरोधात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने काढले आहे. यावर भाजपने टीकास्त्र सोडले असून खुद्द नितेश राणे यांनी आता आमची नाही, तर ठाकरे सरकारची आणि पुणे पोलिसांची चिंता वाढणार असा इशारा दिला. या लुकआऊट नोटीस प्रकरणावर पुणे दौऱ्यावर असलेले राज्याचे गृहमंत्री यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Home Minister clarified about the given to Rane family) गृहमंत्री वळसे पाटील पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत होते. त्या अगोदर राणे कुटुंबीयांविरोधात लुकआऊट सर्क्युलर काढल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याबाबत विचारले असताना वळसे पाटील म्हणाले की, याबाबत केंद्र सरकारने राज्याच्या गृह विभागाला एक पत्र पाठवले होते. ते आम्ही पुणे पोलिसांना दिले. त्यानुसार लुकआऊट सर्क्युलर देण्यात आलेले आहे. या प्रकरणात डीएचएफएलने आर्थिक तक्रार केली होती. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून ती तक्रार पोलीस महासंचालकांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी पुणे पोलिसांना याबाबत लूकआऊट सर्क्यु्लर काढण्याचे आदेश दिले. त्यानुसारच ही कारवाई झाली अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील दिली. क्लिक करा आणि वाचा- नितेश राणे यांचे आघाडी सरकारवर टीकास्त्र पुणे पोलिसांच्या या कारवाईबाबत बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले की, आमचे बँक खाते मुंबईत आहे. असे असताना पुणे पोलिसांनी लुकआऊट सर्क्युलर पुण्यातून कसे काढले. आम्ही जे कर्ज घेतले त्याची आम्हाला सेटलमेंट करायची आहे, असे पत्रच आम्ही पाच महिन्यांपूर्वी कंपनीला दिले आहे. असे असतानाही हे सर्क्युलर कसे काय काढले. क्लिक करा आणि वाचा- या प्रकरणी राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडत इशारा दिला आहे. आता राणे कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ होणार नसून पुणे क्राइम ब्रँच आणि ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ होणार आहे, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. या प्रकरणी आम्ही लवकरच हायकोर्टात जाणार असल्याचेही राणे म्हणाले. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3ySvwV6
No comments:
Post a Comment