Breaking

Thursday, September 9, 2021

भारताच्या सर्व खेळाडूंची करोना चाचणी निगेटीव्ह, पाचवा सामना होण्याची शक्यता https://ift.tt/2Xctbrl

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यामधील पाचवा कसोटी सामना खेळवायचा की नाही, याबाबतचा निर्णय आता घेण्यात आला आहे. भारताच्या सर्व खेळाडूंची करोना चाचणी निगेटीव्ह आली आहे, त्यामुळे आता पाचवा कसोटी सामना १० सप्टेंबरला सुरु होऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत. भारतीय संघातील रवी शास्त्री, भारत अरुण आणि आर. श्रीधर हे प्रशिक्षक करोना पॉझिटीव्ह सापडले आहेत. त्यामुळे त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. हे सर्व जण आता लंडनमध्ये आहेत. पण त्यांच्या संपर्कात भारताचे खेळाडू आले होते आणि त्यामुळे करोना पसरण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे मँचेस्टरमध्ये दाखल झाल्यावर भारतीय संघातील खेळाडूंना आज हॉटेलमधून बाहेर सोडण्यात आले नव्हते. भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला आपल्या हॉटेल रुममध्ये राहण्याची सक्त ताकिद देण्यात आली होती. त्याचबरोबर भारतीय संघ आज पाचव्या कसोटीच्या सरावासाठी मैदानात उतरणार होता. पण भारतीय संघाला आज सरावसाठीही मैदानात जाण्यापासून रोखण्यात आले होते. करोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने या गोष्टी केल्या होत्या. रवी शास्त्री यांना पहिल्यांदा करोना झाला होता. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या भारत अरुण, आर. श्रीधर या सहाय्यक प्रशिक्षकांनाही करोनाची लागण झाली होती. त्यानंतर भारतीय संघाचे फिजिओ नितीन पटेल यांना करोना झाला होता. आता भारतीय संघातील ज्युनिअर फिजिओ असलेल्या योगेश परमार यांनाही करोना झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता भारतीय संघाला धक्का बसला होता. चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी रवी शास्त्री हे आपल्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी भारतीय संघाबरोबर बाहेर गेले होते. त्यानंतर शास्त्री यांना करोना झाल्याचे पाहायला मिळाले. शास्त्री यांनी यावेळी इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाची परवानगी यावेळी घेतली नसल्याचेही समोर आले होते. त्यामुळे बीसीसीआय शास्त्री यांच्यावर चांगलीच रागावलेली पाहाला मिळत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमधअये शास्त्री यांच्यावर बीसीसीआय कठोर कारवाई करू शकते, असेही संकेत मिळत आहेत. पण इंग्लंडच्या दौऱ्यानंतर आयपीएल सुरु होणार आहे आणि त्यानंतर ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळवण्यात येणार आहे. या विश्वचषकानंतर शास्त्री यांचा करार संपत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2X4AqBI

No comments:

Post a Comment