मँचेस्टर: मुंबईवर २००८मध्ये २६ नोव्हेंबरला झालेल्या हल्ल्यानंतर इंग्लंड संघ मायदेशी परतला होता. मात्र, त्यानंतर इंग्लंड संघाने पुन्हा भारतात येऊन मालिका पूर्ण केली होती. ही जाणीव बीसीसीआयने ठेवावी, असे भारतीय संघाचे माजी कर्णधार यांनी सांगितले. त्याचबरोबर कसोटी पुढील वर्षीच्या दौऱ्यात खेळविण्याच्या भारतीय क्रिकेट मंडळाच्या (बीसीसीआय) प्रस्तावाचे गावस्कर यांनी स्वागत केले. करोनाच्या भीतीमुळे भारत-इंग्लंडदरम्यानच्या मालिकेतील पाचवी कसोटी रद्द करण्यात आली. अद्याप मालिकेचा निर्णय झालेला नाही. भारतीय संघ पुढील वर्षी जुलैमध्ये मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्या वेळी ही कसोटी खेळविण्यात यावी, असा प्रस्ताव बीसीसीआयने इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाला दिला आहे. दोन्ही बोर्डांमध्ये कसोटीबाबत चर्चा नंतर होणार आहे. या पार्श्वभूमीवर गावस्कर म्हणाले, 'रद्द झालेली कसोटी भविष्यात खेळविण्याचा प्रस्ताव अगदी योग्य आहे. २००८मध्ये इंग्लंड संघ मालिका पूर्ण करण्यासाठी पुन्हा आला होता. त्या वेळी इंग्लंड संघ सुरक्षिततेचे कारण देत भारतात येणार नकार देऊ शकली असती. मात्र, त्यांनी तसे केले नाही.' मुंबईवर हल्ला झाला तेव्हा भारत-इंग्लंडदरम्यान कटक येथे वन-डे लढत सुरू होती. यातील सात सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या दोन वनडे रद्द करण्यात आल्या. यानंतर इंग्लंड संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतात आला होता. त्या वेळी इंग्लंड संघाचे कर्णधार केविन पीटरसन होते. गावस्कर म्हणाले, 'भारतात पुन्हा परतण्याचा निर्णय पीटरसनचा होता. त्या वेळी पीटरसनने नकार दिला असता, तर तो दौरा तिथेच संपला असता.'
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3nE0PRN
No comments:
Post a Comment