Breaking

Saturday, September 11, 2021

पोलिसांना माहिती पुरवत असल्याच्या आरोप करत नक्षल्यांकडून इसमाची हत्या https://ift.tt/3k6fJOt

गडचिरोली: धानोरा तालुक्यातील मुरूमगांव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील केहकावाही गावातील एका इसमाला गुरूवारच्या रात्री नक्षलांच्या एका गटाने घरातून अपहरण करून नेल्यानंतर शनिवारी पहाटे त्याची कुऱ्हाडीने हत्या करून शव गावालगतच्या जंगलात टाकले असल्याची घटना समोर आली आहे. बिरसुराम तुलावी असे मृतकाचे नाव असून तो केहकावाही येथे शेती करीत होता. नक्षल्यांनी गुरूवारी रात्री त्याला घरून उचलले व जंगलात घेऊन गेले. त्याला प्रचंड मारहाण केली व नक्षलांची माहिती पोलीसांना देतो असा आरोप ठेवून त्याची हत्या केली. व शव गावाजवळ टाकून दिले. घटनेची माहिती आज सकाळी जंगलाकडे गेलेल्या माणसांना झाली. त्यावरून पोलिसांना सुचित करण्यात आले. वाचाः प्राप्त माहितीनुसार मृतकाचे शव त्यांच्या नातेवाईकांनी ताब्यात घेतले. मागील २४ तासात त्या भागात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे गावाजवळचा नाला भरून वाहत होता त्यामुळे शव उत्तरीय तपासणीसाठी किंवा पोलीस कारवाईसाठी आणू शकले नाहीत. सदर घटने संदर्भात जिल्हा पोलीस अधिक्षक यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत अजून काही माहिती स्पष्ट झाली नाही.अधिकृत माहिती घेतल्यावर कळविण्यात येईल असे मटासोबत बोलताना सांगितले. वाचाः


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3tB67y0

No comments:

Post a Comment